Devendra Fadnavis | ड्रग्स तस्करांवर मोक्का लावणार : मुख्यमंत्री फडणवीस यांची विधानसभेत घोषणा

Assembly Session | भाजप आमदार प्रवीण दटकेंच्या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत माहिती
MCOCA on drug traffickers Maharashtra
Devendra FadnavisPudhari
Published on
Updated on

MCOCA on drug traffickers Maharashtra

नागपूर : अखेर उपराजधानी नागपुरात ड्रग्स तस्करांवरील कारवाईला गती मिळाली असून आता ड्रग्स तस्करांवर मोका लागणार आहे. भाजप आमदार प्रवीण दटकेंच्या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत ही ग्वाही दिली.

पोलिस विभागाने डिसेंबर महिन्यात घातलेल्या धाडीत लाखोंचे ड्रग्स हस्तगत करण्यात आले तसेच ड्रग्स तस्करांवर NDPS अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

नागपुरात पोलिस विभागाने राबवलेली ऑपरेशन थंडर मोहिम अधिक व्यापक करण्याची मागणी तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून प्रवीण दटके यांनी केली. ड्रग्स तस्करी थांबवण्यासाठी त्यांचावर मोका लावून राज्यात झिरो टोलरंस अभियान राबवणार असल्याने मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

MCOCA on drug traffickers Maharashtra
Devendra Fadnavis | नागपूर, मुंबई वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयाला स्वायत्तता देण्यासंदर्भात समिती स्थापन: मुख्यमंत्री फडणवीस

प्रवीण दटके यांनी सभागृहात विविध मुद्दे उपस्थित केले.यात नागपुरात कारवाईत सापडलेल्या ड्रग्स तस्करांवर NDPS अंतर्गत कारवाई केली.परंतु त्यांच्यावर मोक्का अंतर्गत आरोप पत्र (चार्ज शीट) दाखल झाले आहे का ? नागपुरातील ड्रग्स पेडलर्सचे जाळे शोधण्यासाठी तसेच त्यांचे इतर राज्यातील कनेक्शन (बॅकवर्ड लिंकिंग शोधण्यासाठी) विशेष मोहीम हाती घेतली आहे का ?

ड्रग्स तस्करांच्या मालमत्तेचा संपूर्ण अहवाल तयार झाला आहे का ? असल्यास मालमत्तेवर जप्तीची कारवाई तसेच त्यांची बँक खाती गोठवली आहेत का ? नागपुरातील गुन्हेगारी संपवण्यासाठी संवेदनशील भागात नियमित कॉम्बिंग ऑपरेशन सुरू ठेवणार का ? अंमली पदार्थ तस्करांचे जाळे शोधण्यासाठी राज्यात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे का ? असे विविध प्रश्न उपस्थित केले.

MCOCA on drug traffickers Maharashtra
Devendra Fadnavis | इंधन टंचाईबाबत काँग्रेसने घबराट निर्माण केली : मुख्यमंत्री फडणवीस

शेवटी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या उत्तरात सांगितले की, ड्रग्स तस्करांवर NDPS अंतर्गत कारवाई करण्यात आली असून मालमत्ता जप्तीची विहित पद्धत पाळून कार्यवाही करणार आहे. तसेच तस्करांनी अवैध बांधकाम केले असल्यास त्यावरही कारवाई करण्यात येईल असे आश्र्वासित केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news