Nagpur News | बावनकुळेंच्या मुलाच्या कारची अनेक वाहनांना धडक, दोघांना अटक

बावनकुळे म्हणाले, कार माझ्या मुलाच्या नावावर
Nagpur News
नागपूरमधील सेंटर पॉईंट हॉटेलसमोर एका भरधाव ऑडी कारने अनेक कार आणि काही दुचाकींना धडक दिली.(Photo Photo)
Published on
Updated on

नागपूर; ‍वृत्तसंस्था

नागपूरमधील काचीपुरा ते रामदास पेठ, रिझर्व बँक चौक या परिसरात एका भरधाव ऑडी कारने अनेक कार आणि काही दुचाकींना धडक दिली. रविवारी मध्यरात्री साडेबारा- एकच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेनंतर कारमधील दोघांना अटक करण्यात आली. दरम्यान, ज्या ऑडी कारने अनेक वाहनांना धडक दिली; ती कार भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Maharashtra BJP chief Chandrashekhar Bawankule) यांचे सुपुत्र संकेत बावनकुळे (Sanket Bawankule) यांच्या नावावर आहे. पण त्यावेळी ते स्वतः गाडीत नसल्याचे सांगण्यात आले आहे.

त्यांचा चालक अर्जुन जितेंद्र हावरे (वय २४ वर्षे) आणि त्याचा मित्र रोहित चिंतमवार (२७) या कारमध्ये होते, अशी माहिती सीताबर्डी पोलिस स्थानकाचे निरीक्षक चंद्रशेखर चकाटे यांनी दिली. या दोघांना अटक करण्यात आली आहे. पण पांढऱ्या रंगाच्या एमएच ४० सीवाय ४०४० ची नंबर प्लेट अपघातानंतर पडली की काढली गेली, यावरूनही चर्चा जोरात आहे.

हॉटेल सेंटर पॉईंटसमोर नेमकं काय घडलं?

हॉटेल सेंटर पॉईंट परिसरात एका कारला धडक दिल्याने आरडाओरड झाली. कारचालक जितेंद्र सोनकांबळे यांच्या तक्रारीवरून सीताबर्डी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे धडक देऊन पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोघांवर गुन्हा दाखल करीत सदर कार ताब्यात घेतली. तत्पूर्वी रिझर्व्ह बँक चौकात एका दुचाकी, सायकल स्वाराला या कारने धडक देत पळ काढला होता. यानंतर काचीपुरा परिसरात या करचालकाने भरधाव कारने अनेक वाहनांना धडक दिली.

अपघात प्रकरणी दोघांना अटक -पोलीस अधिकारी

“सेंटर पॉइंट हॉटेलसमोर एका कारने दोन कार आणि दुचाकीला धडक दिल्याची घटना गेल्या काल रात्री घडली. या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही. या प्रकरणी अर्जुन हावरे आणि रोहित चिंतमवार या दोघांना अटक करण्यात आली. त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे,” अशी माहिती पोलीस अधिकारी अनामिका निर्मला अनिलराव यांनी पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.

बावनकुळे म्हणाले, कार माझ्या मुलाच्या नावावर

काचीपुरा ते रामदास पेठ, रिझर्व बँक चौक या परिसरातील अपघातानंतर राजकीय वातावरण तापले आहे. या अपघातास कारणीभूत ठरलेली कार माझ्या मुलाच्या नावावर आहे, अशी कबुली देतानाच पोलिसांनी सीसीटीव्ही तपासून योग्य ती कारवाई करावी, दोषींवर कारवाई व्हावी, कुणालाही वेगळा न्याय नको, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.

कुणालाही दुखापत, जीवितहानी नाही

या अपघातात सुदैवाने कुणालाही इजा, जीवितहानी झाली नाही. याबद्दल देवाचे आभारही त्यांनी मानले. मात्र, विरोधक आरोप करणारच. पोलिस यंत्रणेवर कुणाचा दबाव नाही. मी कुणाशीही बोललो नाही. कायदा सर्वाना सारखाच असतो, असेही त्यांनी सांगितले. सोमवारी नागपुरातच नव्हे राज्यभरात या अपघाताची चर्चा होती. नेतापुत्राची गाडी असल्याने सोशल मीडियावर या अपघाताचे वृत्त व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळातही मोठी चर्चा रंगली. उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी ही ही कार प्रताप कामदार यांच्या मालकीची असून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे सुपुत्र संकेत बावनकुळे स्वतः गाडीत होते, असा आरोप केला.

Nagpur News
नागपूर- उमरेड रोडवर ट्रक-बसचा भीषण अपघात; ४ ठार, 23 जण जखमी

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news