

Power Plant Contract Workers News
नागपूर- राज्यात विक्रमी 30 लक्ष घरे पुढच्या दोन वर्षात निर्माण होणार. आहेत..कोराडी ,खापरखेडा वीज प्रकल्पाचे कंत्राटी कामगारांना 5000 घरे बांधून देण्याचा निर्णय झाल्याची माहिती महसूल मंत्री व नागपूर आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. या माध्यमातून स्वस्तात घर मिळणार आहे. प्रधानमंत्री आवास योजना आम्ही योजना राबविता आहे. असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
या सोबतच कामठी शहरामध्ये अडीच हजार घर बांधण्याचा निर्णय करतोय. भिलगाव, खैरी जवळ 5000 घर बांधण्याचा निर्णय घेतला आहे 80 टक्के काम पूर्ण झाले आहे. नागपूर शहर आणि जिल्ह्यातील साडेपाच हजार लोकांना तयार घर देणार आहे. याशिवाय मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री घराचे वाटप करणार आहे. लवकरच नागपूर शहरांमध्ये हिस्लाप कॉलेजच्या जवळ जी म्हाडाची इमारत आहे ती पुनर्विकसीत करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. जेवढे अतिक्रमण आहे तेवढे काढून त्यांना सुद्धा घर मिळाले पाहिजे याची योजना तयार केली आहे. झोपडपट्टीत जे लोक राहतात त्यांची यादी तयार करण्याचं काम महानगरपालिकेच्या आयुक्तांनी सुरु केले आहे. दरम्यान, झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या लोकांना पंतप्रधान आवास योजने अंतर्गत घर देण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांच्याकडून हे मोठे पॅकेज महाराष्ट्राकडे आले आहे.
कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांनी यंत्रणेला सूचना दिल्या आहेत. या राज्यामध्ये पहिला विषय पाणीटंचाई आणि गुरांच्या छावण्या असेल. नागपूर जिल्ह्यामध्ये पाण्याचा साठा मुबलक आहे. फक्त काटोल नरखेड भागामध्ये आठशे फूट खाली पाणी गेले आहे हे चित्र बदलावे ही पालकमंत्री म्हणून माझी जबाबदारी आहे. असेही बावनकुळे यांनी सांगितले.
राहुल गांधी पहलगामला चालले हे चांगलच आहे. दहशवादी हल्ला हो देशावर झालेला हल्ला आहे. सर्व पक्षाने एकत्र यातून पुढे जायचे आहे. देश मजबूत करायचा आहे. त्यामुळे राहूल गांधी यांच्या दौऱ्याबाबत कोणतेही राजकारण करणार नाही. केंद्र सरकारने घेतलेले कठोर निर्णय चांगलेच आहेत.