Nagpur News | कन्हान नदीच्या पाणी पातळीत वाढ, जलशुद्धीकरण प्रकल्पावर परिणाम

वस्त्यांचा पाणीपुरवठा प्रभावित
Nagpur News
कन्हान नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे file photo
Published on
Updated on

नागपूर - गेले दोन दिवस मुसळधार पावसामुळे मंगळवारी 10 सप्टेंबरच्या मध्यरात्रीपासून कन्हान नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे. यासोबतच पेंच नवेगाव खैरी धरणाचे सर्व 16 दरवाजे उघडण्यात आले, ज्यामुळे पाण्याचा प्रवाह आणखी वाढला. यामुळे ड्राय वेल-1 च्या सेक्शन स्ट्रेनरवर मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. जलवाहिनीत अडथळे निर्माण झाले आहेत. परिणामी, ड्राय वेल-1 मधून पाणी पंपिंग तात्पुरते थांबविण्यात आले आहे.

या समस्येमुळे कन्हान जलशुद्धीकरण प्रकल्पातून (WTP) प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुरवठा काही प्रमाणात कमी होईल. पाण्याची पातळी स्थिर होताच, संपूर्ण पंपिंग पुन्हा सुरु करण्यात येणार आहे. प्रभावित क्षेत्र भारतवाडी, कळमना, सुभान नगर, मिनीमाता नगर, भांडेवाडी,लकडगंज बाबुलबन, पारडी, शांतिनगर, वांजरी कळमना, नंदनवन, ताजबाग, खरबी वाठोडा, बिनाकी, उप्पलवाडी, इंदोरा, बेझनबाग, बस्तरवाडी या वस्त्यांचा पाणीपुरवठा प्रभावित झाला आहे.

पाणीपुरवठ्याबाबत अधिक माहितीसाठी, ग्राहक NMC-OCW हेल्पलाइन क्रमांक 1800 266 9899 वर संपर्क साधू शकतात किंवा contact@ocwindia.com वर ईमेल करू शकतात.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news