

Suspicious government actions
नागपूर : मुळात इतक्या कमी कालावधीच्या हिवाळी अधिवेशनात न्याय मिळणे शक्य नाही. तरी देखील विदर्भातले अनेक प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न पुढील चार दिवसात मांडण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. तर दुसरीकडे सरकारी यंत्रणेच्या सर्व हालचाली संशयास्पद आहेत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे विधिमंडळ पक्षनेते जयंतराव पाटील यांनी गुरूवारी (दि.११) सभागृहाबाहेर पत्रकारांशी बोलताना केला.
३२ जीआर काढून हजारो कोटींचा निधी शेतकऱ्यांना दिला असे सरकार जाहीर करत असले तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांपर्यंत हा निधी पोहोचलेला नाही, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
सरकारी यंत्रणेच्या सर्व हालचाली या संशयास्पद आहेत. लोकांना ईव्हीएमवर विश्वास नाही, म्हणून जिथे तिथे पाळत ठेवली जात आहे. निवडणूक आयोगावर लोकांचा विश्वास राहिलेला नाही. बॅलेट पेपरवर निवडणुका व्हाव्यात, हा लोकांचा आग्रह दिसत आहे, यावर जयंत पाटील यांनी भर दिला.
विरोधी पक्षातील आमदारांना तर निधी मिळत नाही. मात्र, सत्ताधारी पक्षातील आमदार देखील त्याबद्दल नाराजी व्यक्त करताना दिसतात. सत्ताधारी आमदारांतही आवडते, नावडते हा विषय दिसत असल्याचा टोला लगावला.