

IndiGo flight bird hit Nagpur airport
नागपूर: नागपूर ते कोलकाता हवाई प्रवासाला निघालेल्या इंडिगो एअरलाईन्सच्या विमानाला उड्डाण झाल्यानंतर काही वेळात एक पक्षी जोरात धडकल्याने सर्वांचीच भंबेरी उडाली. अखेर हे विमान तातडीने माघारी फिरले. सुदैवाने अनर्थ टळला.
या विमानात 272 प्रवासी होते. यात काँग्रेस, भाजपचे नेते, पदाधिकारी सहभागी होते. वैमानिकाने नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर हे विमान सुरक्षित उतरवताच या सर्व प्रवाशांनी सुटकेचा श्वास घेतला. इंडिगो एअरलाइन्सने तांत्रिक बिघाडामुळे या विमानाला माघारी फिरविण्यात आल्याचे सांगण्यात आले.
या इंडिगो एअरलाईन्स विमानातील प्रवाशांमध्ये भाजपचे माजी आमदार सुधाकर कोहळे, शेखर भोयर, काँग्रेसचे नितीन कुंभलकर आदी अनेक नेते,पदाधिकारी होते. दुसऱ्या विमानाने या प्रवाशांना कोलकाता पाठविण्यात येणार असल्याची माहिती विमानतळ सूत्रांनी दिली.