

Prakash Ambedkar Prediction India War
नागपूर : डॉलरचे अवमूल्यन होऊ नये, यासाठी अमेरिका तर चीन आपले प्रयत्नात आहे. ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वर्चस्वाच्या लढाईत, सहा महिने थांबा आपली अर्थव्यवस्था गडगडल्याशिवाय राहणार नाही. येत्या दोन अडीच महिन्यात भारताला युद्धास तोंड द्यावे लागेल, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी (दि.७) पत्रकार परिषदेत दिला.
विकासाचे निर्देशांक पाळले जात नाही. या विकासातून युवकांना रोजगार नाही. सामान्य माणसाच्या चेहऱ्यावर आनंद दिसत नाही. भाजप विकासाचा गवगवा करीत असली तरी पावणेदोन हजार कोटींनी तोट्यातील मेट्रोचा भार महापालिकेवर येणार असल्याने मनपा निवडणुकीत नागपुरात भाजपला मतदान करू नका, यातून मोदींचा इगो दुखावेल. लोकशाहीत काही प्रश्न जनतेलाच सोडवावे लागतात, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी, पंतप्रधान कार्यालय वेगळी भूमिका मांडते, तर दुसरीकडे सैन्यदलाचे प्रमुख चीनच्या संदर्भात वेगळी भूमिका मांडत आहेत. पीएमओ कार्यालयावर यात तडजोडीचा संशय आहे. स्वातंत्र्यानंतर हे प्रथमच घडत आहे. आम्ही प्रादेशिक पक्ष असून राष्ट्रीय पक्षांनी याबाबतीत चुप्पी सोडून स्पष्ट भूमिका घ्यावी, असे सांगत काँग्रेसचे नाव न घेता लक्ष्य केले.
विश्वगुरू कोण यावरून ट्रम्प आणि मोदी यांच्यात इगोचा संघर्ष सुरू आहे. वर्चस्वाच्या लढाईत भारतीय नागरिकांना परिणाम भोगावे लागणार आहेत. रशियाचे तेल कुणी विकायचे यातून युक्रेनचे युद्ध सुरू आहे. 44 हजार कोटींचा नफा भारताच्या नव्हे, रिलायन्सच्या तिजोरीत जात आहे. यातूनच भारताचा आर्थिक कणा मोडण्याचे प्रयत्न सुरू आहे. आम्ही चीनसोबत असल्याने युरोपियन देश आपल्याविरोधात गेल्याचे आंबेडकर म्हणाले.