

पुढारी ऑनलाईन डेस्क : Nagpur violence |"सोशल मीडियावरील वादग्रस्त पोस्टनंतर नागपूरमध्ये हिंसाचार घडला. यातील १०४ आरोपींची ओळख पटली आहे. यामधील ९२ जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच लवकरात लवकर संचारबंदीत शिथिलता आणली जाईल", अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. नागपूर हिंसाचार प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांसोबच्या बैठकीत आज (दि.२२) आढावा घेतला. त्यानंतर ते आज नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
हिंसाचारादरम्यान झालेली नुकसान भरपाई येत्या ३ ते ४ दिवसांत दिली जाईल. या हिंसाचारात जेवढं नुकसान झाल आहे, त्याची सर्व नुकसान भरपाई दंगेखोरांकडून वसूल करण्यात येईल. आणि ती दिली नाही तर संपत्ती जप्त केली जाईल. तसेच अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडल्यास कठोरात कठोर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस प्रशासनाला देण्यात आल्या आहेत, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.
नागपूर शांतिप्रिय शहर आहे. समाजकंठकांना आताच सरळ नाही केले तर, या पुढेदेखील राज्यात असे दंगे होतील. नागपूर हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी CCTV, मोबाईल चित्रीकरण, पत्रकारांनी दिलेले चित्रीकरण यानुसार कारवाई केली आहे. या प्रकरणात आतापर्यंत ९२ आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींमध्ये १२ अल्पवयीन मुलांचादेखील समावेश आहे. त्यांच्यावरदेखील कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हणाले.
औरंगजेब कबर जाळली. त्याची तक्रार काही लोकांनी केली ती दाखल करून घेतली. त्यानंतर कबर जाळत असताना 'कुराण'मधील 'आयत' लिहिलेली चादर जाळली असा अपप्रचार सोशल मीडियावर झाला. त्यामुळे नागपूरमध्ये जमवाजमव झाली आणि त्यानी गाड्या फोडल्या, त्यानंतर दगडफेक झाली. यावर पोलिसांनी 4 तासांत याच्यावर आवर घातला. पोलिसांनी अश्रू कांड्या आणि जे आवश्यक प्रतिबंध होते त्याचा वापर केला, अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.
1992 नंतर नागपूरात अश्या पद्धतीची दंगल झाली नाही, नागपूरच्या संस्कृतीला हे शोभणारे नाही. ज्यांनी पोलिसांवर हल्ला केला त्यांना त्यांच्या कामावर पश्चाताप करावा लागणार त्यांना कडक शिक्षा केली जाणार आहे, या प्रकरणाचा तपास सुरू आहे. काही पोस्टमध्ये अश्या गोष्टी समोर आल्या ज्या बांगलादेशी वाटतात पण आज यात बांगलादेशचा हाथ आहे असं म्हणता येणारं नाही. या हिंसाचारात मालेगाव कनेक्शन समोर आले आहे.