८५ वर्षावरील नागरिक आणि दिव्यांगासाठी घरातून मतदान करण्याची व्यवस्था

निवडणूक प्रक्रिया काटेकोरपणे पार पाडली जावी; जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
Maharashtra Assembly Election |
निवडणूक प्रक्रिया काटेकोरपणे पार पाडली जावी असे नागपूर जिल्हाधिकाऱ्यांनी आवाहन केले.Pudhari File Photo
Published on
Updated on

नागपूर : ज्यांचे वय ८५ वर्षांपेक्षा अधिक आहे,असे ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदार यांना घरातून मतदान करण्याचा अधिकार निवडणूक आयोगाने दिला आहे. तसेच निवडणूक कर्तव्यानिमित्त नियुक्त कर्मचारी मतदारांना आपल्या मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी निवडणूक आयोगाने कार्यपध्दती विहित करुन दिली आहे. कोणताही मतदार आपल्या हक्कापासून वंचित राहू नये यादृष्टीने भर दिल्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी गुरुवारी सांगितले. नागपूर जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदार संघात निवडणूक प्रक्रिया काटेकोरपणे पार पाडली जावी या उद्देशाने आयोजित बैठकीत ते बोलत होते.

गृह मतदानासाठी नमुना 12-ड तत्काळ उपलब्ध करुन देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. याचबरोबर दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना ही निवडणूक प्रक्रिया अधिक सुलभ व्हावी याची काळजी घेण्याचे निर्देशही दिले. 12-ड चे फॉर्म सर्व बीएलओंनी काळजीपूर्वक आपल्या भागातील पात्र मतदारांपर्यंत पोहचवण्यासाठी अधिक दक्षता घेण्यास सांगितले.

Maharashtra Assembly Election |
Maharashtra Assembly Election : पुण्यात 'काँटे की टक्कर'

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, जिल्हा पोलिस अधीक्षक ग्रामीण हर्ष पोद्दार, अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, पोलिस उपायुक्त विशेष शाखा श्वेता खेडकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रवीण महिरे, आदी विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

रोकड,दारू तस्करी रोखणार 

जिल्ह्याच्या सर्व सीमांवर काटेकोरपणे तपासणी करण्यात यावी. जिल्ह्यामध्ये अवैध दारूची तस्करी आणि बेनामी रोकडचे वहन होणार नाही, यासाठी सर्व यंत्रणांनी खबरदारी घ्यावी, असे डॉ. विपीन इटनकर यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news