

पुढारी ऑनलाईन डेस्क : Maharashtra Assembly Winter Session | सन २०१९ ला सरकार आमचंच आलं होतं. पण या काळात आम्ही सरकारसाठी २०-२० मॅच खेळली. २०२४ मध्ये अशी बॅटिंग केली की, आम्ही विश्वचषक जिंकला, असा उल्लेख मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (दि.२१) विधानसभेत बोलताना केला. तसेच येत्या ५ वर्षातील विदर्भ-मराठवाड्यासाठीचा रोडमॅप मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत आज मांडला.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "शेतकऱ्यांसाठी सरकारचे अनेक प्रकल्प हातात घेतले आहेत. बळीराजा योजनेतून अनेक प्रकल्प हाती घेतले आहेत. आम्ही आतापर्यंत हाती घेतलेली कामं पूर्ण करणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. विधानसभेच्या अधिवेशनाचा आज शेवट दिवस आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना बोलत होते.
'१० लाख एकर जमीन ओलीताखाली येणार आहे. नदीजोड प्रकल्पासंदर्भातील यापूर्वी केवळ चर्चाच झाली आहे, पण गोसेखुर्द प्रकल्प लवकरच पूर्ण करू, असेही ते म्हणाले. तसेच गोसेखुर्द प्रकल्पाच्या माध्यमातून जलपर्यटनाची संधी निर्माण होईल. विदर्भ, मराठवाड्यातील योजना देखील पुर्णत्वाला नेणार असल्याचे ते म्हणाले. तसेच सांडपाणी शुद्ध करूनच ते नदीत सोडलं जाईल. नागनदी प्रकल्पाला देखील मान्यता देण्यात आली आहे. विदर्भातील सिंचन प्रकल्प देखील अंतिम टप्प्यात आहेत", असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
आम्ही जोडधंदा म्हणून दुग्धप्रकल्प सुरू केला. विदर्भ, मराठवाड्यात दूध उत्पादक शेतकऱ्यांना संधी उपलब्ध करण्यात येणार आहे. यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज विधानसभा अधिवेशनात बोलताना स्पष्ट सांगितले.
गडचिरोली पुढचं स्टिल सीटी म्हणून विकसित होणार.
आमच्या सरकारने वनपर्यटनासोबत, जलपर्यटनाचा विकास हाती घेतला आहे.
अमरावतीत ५ ठिकाणी संत्रा प्रक्रिया प्रकल्प होणार. संत्रा पिकाचं नुकसान झालेल्यांना मदत देणार.
अमरावतीत टेक्सटाईल पार्क उभारणार.
गडचिरोलीत विमानतळ तयार करणार.
विदर्भातील शासकीय विद्यालयाचं काम सुरू झाल्याचे माहिती फडवणीस यांनी आज दिली.
समृद्धी महामार्गाने गोंदिया आणि गडचिरोली जोडणार.
अमरावती शहरात केंद्र सरकार मोठी गुंतवणूक करण्याच्या तयारीत आहे. कापसापासून कापड आणि फॅशन अमरावतीत उभारल्याचेही ते म्हणाले.
मराठवाडा विकासाकरिता नवं दालन सुरु करण्यात येईल. विकासाच्या दृष्टीने अनेक प्रकल्प होती घेण्यात आल्याचेही ते म्हणाले.
छत्रपती संभाजीनगर नेक्स्ट इंडस्ट्रियल मॅग्नेट असेल.
येत्या ३ वर्षात गडचिरोलीतील नक्षलवाद संपवणार. उत्तर गडचिरोली नक्षलमुक्त करणार
धान शेतकऱ्यांदा २० हजार बोनस देणार.