

Nagpur Police Assault Case Harshvardhan Jadhav jail
नागपूर: भाजपचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई शिवसेनेचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना पोलीस अधिकाऱ्याला मारहाण प्रकरणात नागपूर जिल्हा न्यायालयाने एक वर्ष कारवास आणि 20 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. जिल्हा न्यायाधीश आर. जे. राय यांनी ही शिक्षा सुनावली.
नागपूरातील हॉटेल प्राइडमध्ये 6 डिसेंबर 2014 रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची बैठक सुरू असताना माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आत प्रवेश घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी विशेष सुरक्षा पथकाचे पोलीस निरीक्षक पराग जाधव यांनी त्यांना रोखले. संतप्त हर्षवर्धन जाधव यांनी त्यांच्या कानशिलात लगावली. पोलिसांनी जाधव यांच्याविरोधात शासकीय कामात अडचण आणि मारहाणीच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला होता.
जिल्हा न्यायाधीश आर जे राय यांनी ही शिक्षा सुनावली. माजी आमदार हर्षवर्धन जाधव हे वारंवार गैरहजर राहत होते. त्यामुळे अटक वॉरंट जारी करण्यात आला. अखेर 17 फेब्रुवारी रोजी जाधव यांना कारागृहात पाठविण्यात आले. दोन्ही बाजूने युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने हर्षवर्धन जाधव यांनी दोषी ठरवले. सध्या जाधव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत असून विधानसभा निवडणुकीत त्यांना त्यांच्या पत्नी संजना जाधव यांनी त्यांना पराभूत केले.