

नागपूर महानगरपालिकेने आरोग्यास धोकादायक अशा खुल्या भुखंडाच्या मालकांविरुद्ध कडक कारवाईला सुरुवात केली आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार मनपाद्वारे आरोग्यास धोकादायक अशा ११ खुल्या भुखंडाच्या मालकांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. मनपाच्या आशीनगर झोन अंतर्गत येणाऱ्या ११ खुल्या भुखंडाच्या मालकांविरुद्ध मुख्य स्वच्छता अधिकारी सुनील तांबे यांच्यामार्फत कपिलनगर पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला.
महानगरपालिका घनकचरा विभाग प्रमुख डॉ. गजेंद्र महल्ले यांनी दिलेल्या माहितीनुसार, मनपाच्या आशीनगर झोन अंतर्गत येणाऱ्या मुरनाल मेश्राम, विश्राम नगर कपिल नगर, सिध्दार्थ मडपे प्लॉट नं 32 सुगतनगर, कपिल नगर, नागेश धमगाये, रमाईनगर, कपिल नगर, विशाल हरीदास मेश्राम, भूखंड क्रमांक 160,161 रमाईनगर, कुंडलीक कराडे भुखंड क्र 136/ऐ, कपिल नगर, राजासींग बघेल भुखंड क्रमांक 114/ऐ रमाई नगर, ब्रम्हदीप यादव भुखंड क्रमांक 93/ए रमाईनगर, सुनिता मदन जैसवाल कामगार नगर, विजयकांत पानबुडे प्लॉट नं347 सन्याल नगर, वसंत शंभरकर प्लाट नं 292 बौध्द कॉलोनी, कपिल नगर, नरेद्रजी मौर्य, प्लॉट नं45,46 कपिलनगर हे मालकीचे भुखंड असुन सर्व भुखंड खुले असल्यामुळे त्यावर मोठ्या प्रमाणात झाडे झुडपे गवत इत्यादी वाढलेले आहे. त्यामुळे भुखंडामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचलेले आहे.
या सर्व गोष्टींमुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला असुन आजारामुळे तेथील नागरिकाच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. सदर भुखंडधारक हे आपले भुखंडावरील स्वच्छतेबाबत दुर्लक्ष करत असलेबाबत आशीनगर झोनमार्फत य सर्व भूखंड धारकांना वारंवार नोटीस देवुन सुध्दा मनपानी दिलेल्या मुदतीस त्यांचे कडून भुखंड साफसफाई करण्यात आली नसल्याने त्यांच्याविरुद्ध अखेर एफआयआर दाखल करण्यात आला आहे.