नागपूर : मुसळधार पावसामुळे दिल्लीची विमाने दुसऱ्या मार्गाने वळवली

दिल्लीची विमाने रायपूर, इंदोर मार्गे वळवली
Delhi flights diverted via Raipur, Indore
दिल्लीची विमाने रायपूर, इंदोर मार्गे वळवली Pudhari Photo
Published on
Updated on

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : दिल्ली येथे सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बुधवारी (दि.31) रात्री उशीरापर्यंत दक्षिण भारतातून देशाची राजधानी दिल्लीला जाणारी अनेक विमाने नागपुरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरविण्यात आली होती.दुसरीकडे दिल्लीवरून नागपुरात येणाऱ्या विमानांना रायपूर, इंदोरच्या दिशेने वळविण्यात आली.

Delhi flights diverted via Raipur, Indore
नागपूरवरून दिल्ली, मुंबई, बंगळुरूला जाणारी ४ विमाने रद्द

यामुळे साहजिकच दिल्ली नागपूर असा प्रवास करणाऱ्या आणि नागपुरात निर्धारित वेळेत पोहचण्यासाठी आतुर असलेल्या हवाई प्रवाशांना इंदोर विमानतळावर प्रतीक्षा करीत ताटकळत बसावे लागले. रात्री उशिरापर्यंत मग त्यांना नागपुरात आणले जाणार असल्याची माहिती विमानतळ सूत्रांनी दिली. यामुळे दिल्लीतल्या वाईट हवामान, मुसळधार पावसाचा नागपूर आणि दक्षिण भारतातील हवाई प्रवाशांना चांगलाच फटका बसला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news