

नागपूर : राज्यात प्रतिबंधीत असलेली विदेशी दारू 41 लाखांची उत्पादन शुल्क विभागाने पकडली आहे. 7ऑक्टोबर रोजी 230 लिटर विदेशी मद्याचा मद्यसाठा व वाहन असा एकूण 16 लाख 13 हजार रुपये किमंतीचा मद्यसाठा जप्त करण्यात आला. 13 ऑक्टोबर रोजी मध्यप्रदेश, उत्तराखंड निर्मित 17.11 लिटर स्कॉच मद्यसाठा व वाहन असा एकूण 18 लाख 99 हजार 80 रुपये किमंतीचा मद्यसाठा जप्त केला.
तसेच 15 ऑक्टोबर रोजी 146.88 लिटर विदेशी मद्याचा साठा व वाहन असा एकूण 6 लाख 5 हजार 824 रुपये किमंतीचा मद्यसाठा असा एकूण 41 लाख 18 हजार 108 रुपये किमंतीचा मध्यप्रदेश व अन्य राज्यात निर्मीत विदेशी मद्यसाठा जप्त करुन कारवाई केली.
या कारवाईमध्ये निरीक्षक शैलेश अजमिरे, विक्रम मोरे, मोहन पाटील, जयेंद्र जठार, आनंद पवार, मंगेश कावळे, दत्तात्रय लाडके, बालाजी चाळणेवार, जितेंद्र पवार, अनिल जूमडे, दुय्यम निरीक्षक व त्यांच्या पथकाचा समावेश होता.