नागपूर; पुढारी वृत्तसेवा : नागपुरात शुक्रवारी (दि.३) दुपारी तीन ते सव्वा तीनच्या सुमारास सौम्य स्वरूपात भूकंपाचे धक्के जाणवले. शहराच्या काही भागात हे धक्के जाणवले असले तरी, बहुतांशी लोकांना याविषयीची कल्पनाच नाही. भूकंप मापन यंत्रावर २.५ मॅग्नेट्यूड अशी या भूकंपाची नोंद झाली असून, नागपूरच्या पाच किलोमीटर परिसरात हे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याची नोंद नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीच्या वेबसाईटवर करण्यात आली आहे.
भूगर्भशास्त्रज्ञांच्या मते हा अतिशय सौम्य धक्का असल्याने कुठलीही हानी झालेली नाही, किंबहूना अनेकांना हे धक्के जाणवले देखील नाहीत. आज म्यानमार येथे ४ तर फिलिपाईन्स येथे ५.७ आणि नागपुरात २.५ मॅग्नेट्यूड अशी या भूकंपाची नोंद झाली आहे. नागपुरातील हा भूकंप दुपारी ३.११ मिनिटे ९ सेकंदानी झाला असून उत्तरेस २१.२९ लॅटित्युड तर पूर्वेस ७९.४४ लांब आणि ५ किलोमीटर पर्यंत तीव्रता होती.