Duplicate Voter Names | दुबार मतदार नावे राज्यभरात : चंद्रशेखर बावनकुळे

विरोधकांनी बोगस मतदार यादीवरून भाजपला लक्ष्य केलेले असताना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मतदार यादीत दुबार नावं सर्व महाराष्ट्रात आहेत असे मोठे विधान केले आहे.
Duplicate Voter Names
दुबार मतदार नावे राज्यभरात : चंद्रशेखर बावनकुळे Pudhari Photo
Published on
Updated on

नागपूर : विरोधकांनी बोगस मतदार यादीवरून भाजपला लक्ष्य केलेले असताना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मतदार यादीत दुबार नावं सर्व महाराष्ट्रात आहेत असे मोठे विधान केले आहे. नागपुरातही प्रत्येक मतदारसंघात दुबार नावे आहेत. डिलीशनची प्रक्रिया सोपी नसल्याने ती होत नाही, एडिशन खूप होतात त्यामुळे जोपर्यंत एस आय आर होत नाही तोपर्यंत मतदार याद्या दुरुस्त होणार नाही याकडे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी लक्ष वेधले आहे. दुबार जरी नावे असली तरी एकच मतदान व्हावे यावर भर दिला.

अमेडिया मुद्रांक शुल्क मुदत बाबतीत बोलताना त्यांनी मुदतवाढ मागितली आणि आम्ही जर दिले नाही तर ते लीगल पॉईंट ठेवतात.वारंवार मुदत वाढ देणार नाही, त्यांना नियमाप्रमाणेच जावं लागेल. फुलंब्री पक्ष प्रवेश यावर बोलताना प्रवेशअनेक ठिकाणी होत आहे, शिवसेनेचा कार्यकर्ता भाजपात आणि भाजपचा कार्यकर्ता शिवसेनेत जात आहे. आमचे कार्यकर्ते शिवसेनेत गेले आहेत. शेवटी ऑप्शन लोकं शोधत असतात पण आमची युती मजबूत आहे. काँग्रेस भकास झाली आहे. डबल इंजिन सरकारच विकास करू शकते. काँग्रेसकडे केवळ कन्फ्युजनचे राजकारण आहे विकासाचे नाही.

Duplicate Voter Names
Nagpur News | नागपूरमध्ये अतिविशेषोपचार वैद्यकीय अभ्यासक्रमांसह ६१५ खाटांचे रुग्णालय

महायुतीत दिल्या सूचना

आम्ही सर्वांनीच निर्णय घेतला आहे की मित्र पक्षाला कोणी टाकून बोलायचं नाही. महायुतीत कुठलेही मनभेद नको याची काळजी घ्यायची आहे. आमच्या पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना रवींद्र चव्हाण यांनी कोणीही चुकीच्या पद्धतीचे स्टेटमेंट करू नका सूचना दिली आहे. राज्यातील सर्व नगरपालिका, नगरपरिषद ग्रामीण भागात पट्टे वाटप हा अधिकार आमचा आहे. 2024 च्या पूर्वी खाजगी घर आहेत ज्यांनी भूखंड घेतले एनएटीपी केला नाही त्या गरीब माणसाचे घर आम्ही कायदेशीर करून द्यायचा निर्णय घेतला आहे.आपला अजेंडा सांगने प्रलोभन नाही. मी महसूल मंत्री म्हणून मला ते अधिकार प्राप्त आहेत. दरम्यान, आमदार आशिष देशमुख नाराजी संदर्भात छेडले असता, पक्षप्रवेशाचा निर्णय हा जिल्हा भाजपने घेतला. त्यामुळे कोणी भेटायला आला तर भेटले पाहिजे,हाच त्या ठिकाणी माझा विषय होता.

Duplicate Voter Names
Nagpur BJP | पालकमंत्री, आमदारांच्या नाराजीनंतर भाजपने रद्द केले पक्ष प्रवेश

राज्याचा फायनान्स डिपार्टमेंटचा कुठलाही निर्णय हे तीनही नेते बसूनच होतो. शेवटी आम्ही मंत्री आहेत. सगळे अधिकार मुख्यमंत्र्यांना प्राप्त असतात. आम्हाला जे अधिकार दिले त्यावर ओवररुल करायचे असेल तर मुख्यमंत्री करू शकतात.

Duplicate Voter Names
Chandrashekhar Bawankule | नोंदणीत गडबड केल्यास मुद्रांक अधिकाऱ्यावर होणार कारवाई: चंद्रशेखर बावनकुळे

अजित दादा अर्थमंत्री म्हणून बोलत असले तरी कुठलाही निर्णय बसून केला जातो. कुणाल कामरा आरएसएस संदर्भात कोणी आक्षेपार्ह पोस्ट टाकले असेल त्यावर पोलीस कारवाई करतील असे बावनकुळे यांनी एका प्रश्नात स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news