अनिल देशमुख यांनी मराठा समाजाची माफी मागावी: डॉ. आशिष देशमुख

अनिल देशमुख यांनी मराठा समाजाची माफी मागावी: डॉ. आशिष देशमुख

नागपूर: पुढारी वृत्तसेवा : नार्को टेस्ट करायचीच असेल, तर माजी मंत्री अनिल देशमुख यांची करावी. कारण अनिल देशमुख यांनी गृह मंत्रालयावर खोटे आरोप केले आहेत. अनिल देशमुख यांनी महाराष्ट्राची आणि मराठा समाजाची माफी मागावी, अशी मागणी माजी आमदार, भाजप नेते डॉ. आशिष देशमुख यांनी केली आहे.

राज्यात सत्तांतरानंतर पवार कुटुंबातील काका- पुतण्याचा वाद चव्हाट्यावर आला. तोच कित्ता आता भाजपवासी झालेले आशिष देशमुख आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्यात पाहायला मिळत आहे. अर्थातच आमदारकीची संधी देणाऱ्या काटोल विधानसभा मतदारसंघावर दोघांचाही डोळा आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. पण त्यांना ओबीसीमधून नव्हे, तर वेगळे आरक्षण दिले पाहिजे, अशी भूमिका भाजपची आहे.

मराठा समाजाचा विषय घेऊन अजित पवार यांना अडचणीत अडकवून पुन्हा आपल्या पक्षात परत आणण्याचा डाव राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा आहे, असा आरोपही देशमुख यांनी यावेळी केला. ओबीसी समाजाची टक्केवारी कमी होऊ नये, यासाठी एकटे वडेट्टीवारच नाही, आम्ही सर्व ओबीसी नेते त्यांच्या पाठीशी उभे आहोत.

दुसरीकडे मराठा समाजाला पण आरक्षण देण्यात यावे, कारण त्यांना पण गरज आहे. मुळात मराठा समाज फडणवीसांवर विश्वास ठेवतो. करण की जेव्हा फडणवीस मुख्यमंत्री होते, तेव्हाच मराठा समाजाला आरक्षण मिळाले होते. पण महाविकास आघाडीच्या सरकारने ही केस व्यवस्थित हाताळली नाही, म्हणून सुप्रीम कोर्टात आरक्षण टिकू शकले नाही, याकडे देशमुख यांनी लक्ष वेधले.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news