

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : भाजपचे आमदार सुरेश धस यांच्या संदर्भात वारंवार प्रश्न विचारून राजकारण करू नका. यावर कालच बोललो आहे. या प्रकरणी सरकारच्या चौकशीला सगळ्यांनी साथ द्यावी असा संताप राज्याचे महसूल मंत्री आणि नागपूर व अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी व्यक्त केला.
कोराडी येथील जनसंपर्क कार्यालयात माध्यमांशी ते बोलत होते.संतोष देशमुखाच्या मारेकऱ्याला फाशी व्हावी म्हणून चौकशी सुरू आहे. विरोधकांनी प्रकरण भडकवण्याचे काम करू नये. संतोष देशमुख यांची हत्या ही गंभीर आहे. मात्र याकडे राजकारण म्हणून बघू नये .सरकारच्या चौकशीला सगळ्यांनी साथ द्यावी. आरोपीला फाशी झालीच पाहिजे असेही बावनकुळे म्हणाले.