देवेंद्र फडणवीस मी माझ्या अटकेची वाट पाहतोय; अनिल देशमुख असं का म्हणाले?

Maharashtra politics | अनिल देशमुखांचा फडणवीस यांच्यावर हल्लाबोल
Anil Deshmukh statement
देवेंद्र फडणवीस, मी माझ्या अटकेची वाट पाहतोय; अनिल देशमुख असं का म्हणाले?file photo
Published on
Updated on

नागपूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मला सातत्याने अडकविण्याचा प्रयत्न करीत असून मी देखील आपल्या अटकेची वाट पाहत असल्याचा खळबळजनक आरोप माजी गृहमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी मंगळवारी (दि.१०) माध्यमांशी बोलताना केला. यामुळे पुन्हा एकदा फडणवीस-देशमुख असा आजी-माजी गृहमंत्री यांच्यातील संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत.

अनिल देशमुख (Anil Deshmukh) म्हणाले की, "उपमुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ४ वर्षापुर्वीची घटना उकरुन काढीत माझ्या विरुध्द दिल्लीच्या मदतीने सीबीआयच्या माध्यमातून एफआयआर दाखल केला आहे. ४ वर्षापुर्वी मी गृहमंत्री असताना जळगावच्या एका घटनेमध्ये भाजपचे नेते गिरीश महाजन यांच्यावर कारवाई करण्यासाठी मी जळगावच्या पोलीस अधिकाऱ्यावर दबाव टाकला होता, हा माझ्यावर आरोप आहे. माझ्या माहितीनुसार माझ्यावर रेड टाकून मला अट‍क करण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस करीत आहेत. मात्र, ज्या फडणवीसांनी दिल्लीच्या मदतीने ईडी-सीबीआयला हाताशी धरुन महाराष्ट्राचे राजकारण अतिशय खालच्या स्तरावर आणले. देवेंद्र फडणवीस मी माझ्या अटकेची वाट पाहत आहे," असे म्हणत देशमुख (Anil Deshmukh) यांनी फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला.

Anil Deshmukh statement
तिसऱ्या आघाडीची चर्चा असताना 'वंचित'ची आदिवासींसह ओबीसीसोबत आघाडी

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news