Nagpur | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी करणार !

Devendra Fadnavis Diwali with farmers- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी करणार !
CM Devendra Fadnavis
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(File Photo)
Published on: 
Updated on: 

नागपूर - आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांसोबत थेट संवाद साधत दिवाळी साजरी करणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रात्री 9 वाजता शेतकरी बांधवांशी मौजा लोहारी सावंगा (ता. नरखेड) थेट संवाद साधतील. पारडसिंगा येथे आज रात्री मुक्कामी राहतील अशी माहिती आहे.

गेल्यावेळी त्यांनी गडचिरोली येथे पोलिसांसोबत दिवाळी साजरी केली होती. दिवाळीपूर्वी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना प्रत्येकी 5 हजार रुपये तातडीने मदत दिली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. जिल्ह्यातील सर्व तालुक्यात दुष्काळ घोषित करण्यात आला. आतापर्यंत 3 लाख 5 हजार 274 खात्यांमध्ये प्रत्येकी 5 हजार याप्रमाणे 152 कोटी 63 लाख 70 हजार रुपये जमा करण्यात आले आहेत.

तालुकानिहाय संख्या पुढील प्रमाणे --- नागपूर ग्रामीण तालुका 5,625 शेतकरी 2,81,25,000, हिंगणा तालुका 7,728 शेतकरी 3,86,40,000, कामठी तालुका 14,626 शेतकरी 7,31,30,000, मौदा तालुका 51,715 शेतकरी 25,85,75,000, सावनेर तालुका 34,704 शेतकरी 17,35,20,000, कळमेश्वर तालुका 29,213 शेतकरी 14,60,65,000, रामटेक तालुका 23,126 शेतकरी 11,56,30,000, पारशिवणी तालुक्यातील 24,921 शेतकऱ्यांच्या खात्यात 12,46,05,000 इतकी रक्कम जमा करण्यात आली आहे.

CM Devendra Fadnavis
Nagpur Raipur Highway Accident | नागपूर-रायपूर महामार्गावर अपघातांची मालिका, तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये सहा जण जखमी

काटोल तालुक्यातील 19,181 शेतकऱ्यांच्या खात्यात 9,59,05,000, नरखेड तालुका 33,319 शेतकरी 16,65,95,000, उमरेड तालुका 16,575 शेतकरी 8,28,75,000, कुही तालुका 22,792 शेतकरी 11,39,60,000 तर भिवापूर तालुक्यातील 21,749 शेतकऱ्यांच्या खात्यात 10,87,45,000 इतकी याप्रमाणे एकूण 3 लाख 5 हजार 274 शेतकऱ्यांच्या खात्यात 152 कोटी 63 लाख 70 हजार रुपये जमा करण्यात आले आहे.

CM Devendra Fadnavis
Ramai Awas Yojana : नागपूर महापालिका क्षेत्रातील २ हजार ८ घरकुल प्रस्तावांना मंजुरी; २ हजार घरकुलांचे उद्दिष्ट पूर्ण

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.