

Devendra Fadnavis Nagpur Roadshow
नागपूर : नागपूर महापालिका निवडणुकीचा प्रचाराची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आली आहे. शेवटच्या दिवशी मंगळवारी (दि.१३) दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाईकवर स्वार होत रोडशो केला. भाजप, शिवसेना महायुतीच्या उमेदवार आणि समर्थकांमध्ये यामुळे चैतन्य संचारले.
कडक पोलिस बंदोबस्तात ठीक ठिकाणी या रोड शो चे स्वागत करण्यात आले. मध्य नागपुरातील भारत माता चौक येथून सुरुवात झाली. तीन नळ चौक, शहीद चौक, इतवारी चितार ओळ, गांधी पुतळा, बडकस चौक, महाल मार्गे गांधी गेट येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ या रोडशोचा समारोप झाला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
ठिकठिकाणी फुगे, भाजपचे झेंडे, भगव्या पताका, तोरण, स्वागतद्वार उभारून,पुष्पवृष्टी करीत स्त्री, पुरुष, विविध संघटनेतर्फे या रोड शो चे स्वागत करण्यात आले. विरोधक विकास करूच शकत नाहीत. त्यामुळे महायुतीलाच नागपूरकर कौल देतील. नागपूर तसेच मुंबई मनपावर महायुतीचा भगवा फडकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.