अमरावतीत अंगावर विज पडून शेतकरी ठार

नागपूर : पुढारी वृत्तसेवा 

शेतकऱ्यांसह सामान्य माणूसही चातकासारखी वाट पाहात असलेल्या मान्सूनचे विदर्भात येत्या १२ ते १४ जून दरम्यान आगमन होणार असल्याचा अंदाज नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राने व्यक्त केला आहे. ११ जून रोजी बंगालच्या खाडीत तयार होणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे नागपुरसह विदर्भात मान्सून सक्रिय होईल. 

दरम्यान, भारतीय हवामान खात्याने नागपूर जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी दिनांक ११ जून ते १४ जून या कालावधीत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस व एक किंवा दोन ठिकाणी वादळीवाऱ्यासह विज पडण्याची शक्यता वर्तवली आहे. नागपूर जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच भंडारा जिल्ह्यात आज हलक्या पावसाने हजेरी लावली. दिवसभर ढगाळ वातावरण होते. मागील ३ दिवसापासून अमरावतीत मृगाच्या पावसाला सुरवात झाली असून आज गुरूवारी दुपारी १ वाजतापासून अमरावती जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह मुसळधार पर्जन्यवृष्टी झाली. हा पाऊस दुपारी ४ पर्यंत संततधार बरसला यामध्ये विजेने एका निष्पाप शेतकऱ्याचा बळी घेतला. आपल्या शेतातून काम करून घराकडे परतत असताना वीज पडल्याने एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना आज (दि. १०) दुपारी दीड वाजता दरम्यान धामणगाव तालुक्यातील निंबोली येथे घडली. 

पद्माकर उत्तम वानखडे (वय ४५) मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. वानखेडे हे आप्ल्या शेतात स्प्रिंकल काढण्यासाठी ते गेले होते. घराकडे परतत असताना अंगावर वीज पडून त्यांचा मृत्यू झाला. धामणगाव तालुक्यातील अन्य काही ठिकाणी गावात घरांची पडझड झाल्याची माहिती मिळत आहे. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील जळू येथे वीज पडल्याने ४ जनावरे मृत्यूमुखी पडली आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news