

Maharashtra municipal elections
नागपूर : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने आढावा बैठका व रणनितीवर सविस्तर चर्चा केल्यानंतर आता ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. नगरपरिषद नगरपंचायत निवडणुकीत याच प्रकारे यादी जाहीर करण्यात आली. मात्र, यातील बहुतांशी नेते विदर्भात फिरकलेच नाहीत.
तर दुसरीकडे भाजपने ही निवडणूक मनावर घेतली. शंभरपैकी 52 जागी विजय मिळविला. पराभवाच्या भीतीने महाविकास आघाडीने आपल्या कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडल्याचा आरोप स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता.
स्टार प्रचारकांच्या या यादीत राज्याचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्यासमवेत प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधिमंडळ पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार, खासदार छत्रपती शाहू महाराज, विधान परिषदेतील गटनेते आ. सतेज ऊर्फ बंटी पाटील, राष्ट्रीय सरचिटणीस खा.मुकुल वासनीक, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट, काँग्रेस कार्य समितीचे सदस्य बाळासाहेब थोरात,
तेलंगणाचे मंत्री मोहम्मद अझरुद्दीन, खासदार रजनीताई पाटील, गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्यसभा खासदार इम्रान प्रतापगढी, राज्यसभा खासदार चंद्रकांत हंडोरे, अखिल भारतीय कार्य समितीचे सदस्य नसीम खान, अभिनेते व काँग्रेस नेते राज बब्बर, अखिल भारतीय कार्य समितीच्या सदस्या यशोमती ठाकूर, खासदार प्रणिती शिंदे, आमदार अमिन पटेल, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, माजी मंत्री सुनील केदार, आ. अमित देशमुख,
आ. डॉ. विश्वजित कदम, आमदार भाई जगताप, अनिस अहमद, माजी मंत्री रमेश बागवे, माजी खा. हुसेन दलवाई, आ. साजिद खान पठाण, कन्हैया कुमार, आमदार जिग्नेश मेवाणी, माजी मंत्री वसंत पुरके, माजी आ. मुजफ्फर हुसेन, एम.एम. शेख, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष वजाहत मिर्झा, वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे, प्रदेश उपाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबिरे व हनुमंत पवार यांचा समावेश आहे.