Cobra Rescue : चार दिवस फरशीच्या भेगेत अडकलेल्या नागाची सुटका; दोन तासांच्या बचाव मोहिमेला यश!

पुढील उपचारांसाठी वन विभागाच्या ट्रान्झिट सेंटरमध्ये नागाला केले दाखल
Cobra Rescue : चार दिवस फरशीच्या भेगेत अडकलेल्या नागाची सुटका; दोन तासांच्या बचाव मोहिमेला यश!
Cobra Rescue : चार दिवस फरशीच्या भेगेत अडकलेल्या नागाची सुटका; दोन तासांच्या बचाव मोहिमेला यश!
Published on
Updated on

नागपूर : नागपुरातील मनीषनगर परिसरात फरशीच्या अरुंद भेगेत तब्बल चार दिवस अडकून पडलेल्या विषारी नागाची सर्पमित्राने धाडसी बचाव मोहीम राबवत सुटका केली. जवळपास दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर नागाला सुरक्षित बाहेर काढण्यात आले असून पुढील उपचारांसाठी वन विभागाच्या ट्रान्झिट सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे.

ही घटना मनीषनगरमधील रेवतीनगर परिसरातील हरियर हॉस्पिटलच्या मागील भागात घडली. फरशीच्या अरुंद भेगेत एक विषारी नाग अडकून असल्याचे स्थानिक नागरिक वैभव चकोले यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ सर्पमित्र शुभम पराळे यांना माहिती दिली. माहिती मिळताच शुभम पराळे घटनास्थळी दाखल झाले.

नाग फरशीखालील अत्यंत अरुंद जागेत अडकल्यामुळे त्याची सुटका करणे मोठे आव्हान ठरले. अखेर सुमारे दोन तास मेहनत घेत कंक्रीटचा काही भाग काळजीपूर्वक फोडण्यात आला आणि नागाला कोणतीही इजा न होता सुरक्षित बाहेर काढण्यात आले. सुटकेनंतर नागाने मोठा उंदीर गिळल्यामुळे त्याचे पोट फुगले होते. त्यामुळेच तो अरुंद भेगेत अडकून पडल्याचे स्पष्ट झाले.

Cobra Rescue : चार दिवस फरशीच्या भेगेत अडकलेल्या नागाची सुटका; दोन तासांच्या बचाव मोहिमेला यश!
Village of Snakes : महाराष्ट्रातील या गावात घर बांधताना नागांसाठी ठेवली जाते विशेष जागा!

सर्पमित्रांनी नागाला पाणी पाजून त्याची प्रकृती स्थिर करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर वन विभागाच्या सेमिनरी हिल्स येथील ट्रान्झिट सेंटरच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात त्याला देण्यात आले. तेथे आवश्यक उपचार आणि निरीक्षणानंतर नागाची प्रकृती सुधारल्यावर त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news