Village of Snakes : महाराष्ट्रातील या गावात घर बांधताना नागांसाठी ठेवली जाते विशेष जागा!

Namdev Gharal

महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात एक असे अनाखे गाव आहे ज्याला जगभरात सापांचे गाव म्हणून ओळखले जाते. हे गाव म्हणजे मोहोळ तालुक्यातील शेटफळ

या गावात नागांना देवाचा दर्जा दिला जातो. या गावात साप केवळ जंगलात किंवा शेतात नाही, तर प्रत्येक घरात कुटुंबातील सदस्याप्रमाणे मुक्तपणे वावरताना दिसतात.

गावातील नागनाथ मंदिरात थेट शिवपिंडीवर नागाकृती कोरली आहे असे मंदिर दुर्मिळ असते. अशी पिंडी असलेल्या या नागनाथ मंदिरामुळेचे गावात नागाला मान आणि आपलेपणा मिळतो, असे म्हटले जाते. 

शेटफळ गावात जुने दगडी वाडे आहेत, या प्रत्येक वाड्यात आणि घरात नागांसांठी वरच्या बाजूला माळवद केलेले आढळते. जुन्या घराची दुरुस्ती करताना आधी माळवदाची सुरक्षित तपासणी केली जाते.

नागांसाठी खास तयार केलेल्या मातीच्या माळवदात गोलाकार आकाराचे बांबू लावले जातात. तिथे नागांना सहजपणे राहता यावे, यासाठी ही सोय असते. कालमानपरत्वे या रचनेत थोडाफार बदल झाला असला, तरी नागांविषयी गावाला वाटणारी आत्मियता बदललेली नाही.

येथील लहान मुले सापांना न घाबरता त्यांच्यासोबत खेळतात असा दावा गावातील लोक करतात.

गावात सापांना मारणे किंवा दुखावणे हे पाप मानले जाते. ग्रामस्थ नागाला गावाचा रक्षक म्हणजेच 'क्षेत्रपाल' मानून त्याची पूजा करतात.

रस्त्यामध्ये कुणाला एकादा नाग दिसलाच तर त्यामुळे घाबरुन न जाता देवबाप्पा आले, असे म्हणत त्याचे स्वागत केले जाते. त्यानंतर त्याला कोणताही अपाय होऊ नये, याची काळजी घेत त्याला सन्मानाने गावातील नागनाथ मंदिरामागे सोडले जाते.

अतिशय विषारी कोब्रा (नाग) घरात फिरत असूनही, आजपर्यंत या गावात सापाने कोणालाही चावल्याची किंवा जीवितहानी झाल्याची नोंद नाही.

महाराष्ट्र शासनाच्या 'सोलापूर जिल्हा गॅझेटियर'मध्ये शेतफळ गावातील सिद्धेश्वर मंदिर आणि तेथील सर्पदंशावरील उपचाराच्या आख्यायिकांचा अधिकृत ऐतिहासिक संदर्भ जोडलेला आहे.