Nagpur Industrial |कळमेश्वरमध्ये 'कोल टू केमिकल' प्रकल्प, ११७ हेक्टर जमीन एमआयडीसीला हस्तांतरित

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
MIDC
MIDC file photo
Published on
Updated on

Kalmeshwar MIDC News

नागपूर: नागपूर जिल्ह्याच्या औद्योगिक विकासासाठी कळमेश्वर तालुक्यातील लिंगा येथे प्रस्तावित 'कोल टू केमिकल' प्रकल्पासाठी ११७ हेक्टर १९ आर जमीन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला (एमआयडीसी) उपलब्ध करून देण्याचा ऐतिहासिक निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.

महसूल मंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पाठपुराव्यामुळे हा प्रकल्प तडीस जाणार आहे. महसूल विभागाने या जमिनीचे वाटप तातडीने मंजूर केले असून, आता या प्रकल्पाचे काम प्रत्यक्ष जमिनीवर सुरू होणार आहे.

MIDC
Nagpur Fire Case | आगीचे तांडव! कामठीतील कारखान्यात 17 सिलिंडरचे एकामागून एक स्फोट

सुमारे २९० एकर जमीन उपलब्ध होणार असून कोळशापासून रसायने तयार करण्याचा हा प्रकल्प पर्यावरणाचे निकष पाळून कार्यान्वित केला जाईल. कळमेश्वर, काटोल आणि नागपूर परिसरातील 30 हजार तरुणांना या प्रकल्पामुळे रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील असा विश्वास पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news