हरियाणामधील विजयाचीच पुनरावृत्ती महाराष्ट्रात होईल: बावनकुळे

Chandrashekhar Bawankule | जम्मू- काश्मीरमध्येही भाजपला मोठे यश
Chandrasekhar Bawankule criticizes  congress
हरियाणा विधानसभा निवडणुकीतील भाजपच्या विजयावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. file photo
Published on
Updated on

नागपूर; पुढारी वृत्तसेवा: हरियाणामध्ये भारतीय जनता पार्टीने ऐतिहासिक यश मिळवले असून याच विजयाची पुनरावृत्ती महाराष्ट्रात होणार आहे, असा विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी (दि.८) व्यक्त केला. लोकसभा निवडणुकीत खोटा प्रचार करणारा काँग्रेस पक्ष या निवडणुकीत पुन्हा उघडा पडला, असेही बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी नमूद केले.

हरियाणामध्ये भाजपची सत्ता स्थापन होत आहे. जम्मू- काश्मीरमध्येही भाजपला मोठे यश मिळाले आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेसने मागासवर्गीय समाजाची दिशाभूल केली होती. मात्र, आता विरोधकांचा खोटारडेपणा जनतेसमोर उघड झाला आहे. मोदी सरकारच्या विकसित भारताच्या संकल्पाला साथ देत जनतेने भरभरून भाजपच्या पारड्यात मतदान केले. (Chandrashekhar Bawankule)

राहुल गांधी यांचे अमेरिकेतील आरक्षणाबाबतचे वक्तव्य ऐकल्यानंतर काँग्रेसचा आरक्षणविरोधी चेहरा समोर आला. राज्याच्या विकासासाठी डबल इंजिन सरकारची आवश्यकता आहे. विरोधकांचे घाणेरडे राजकारण महाराष्ट्रामध्ये हाणून पाडण्यासाठी भाजपा घर चलो अभियान राबवित आहे. विरोधकांचे जातीपातीचे राजकारण हद्दपार करून सर्व समाजांना एकत्र ठेवण्यासाठी भाजपा प्रयत्नशील राहील, असेही बावनकुळे यांनी सांगितले.

Chandrasekhar Bawankule criticizes  congress
नागपूर येथील कोराडीत पटोले आणि बावनकुळे एकत्र!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news