

नागपूर : महाराष्ट्र दिनाच्या औचित्याने जनगणनेच्या पहिल्या टप्प्याला आजपासून सुरुवात झाली. महसूलमंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी https://se.census.gov.in/ या संकेतस्थळावर आपली माहिती भरून स्वजनगणना प्रक्रिया पूर्ण केली. दिनांक 1ते 15 मे या कालावधीत स्वजनगणनाचा पहिला टप्पा राबविण्यात येत आहे.
जनगणना ही देशाच्या भक्कम विकासाला मूर्त स्वरूप देणारी प्रक्रिया असून नागरिकांनी या डिजिटल स्वगणनासाठी आपली जबाबदारी पूर्ण करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पत्रकार परिषदेत केले. यावेळी विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी,नागपूर मनपाच्या महापौर निता ठाकरे, मनपा आयुक्त डॉ विपिन इटनकर, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
जनगणनेचा दुसरा टप्पा 16 मे ते 14 जून दरम्यान राबविण्यात येणार असून त्यामध्ये नागरिकांची जात, धर्म, गाव, शहर, वार्ड आणि इतर विविध सामाजिक-आर्थिक माहिती संकलित केली जाणार आहे. ही प्रक्रिया जगातील सर्वात मोठ्या प्रशासकीय उपक्रमांपैकी एक असून देशाच्या आर्थिक नियोजनासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.नागरिकांनी ghttps://se.gov.census.in या संकेतस्थळावर जाऊन स्वतःची स्वगणना पूर्ण करावी असे आवाहनही बावनकुळे यांनी केले.