Chandrapur Congress Group Leader Dispute | काँग्रेस गटनेतेपदावर आज निर्णायक सुनावणी; नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयात हालचालींना वेग

प्रतिभा धानोरकर गटाचे १६ नगरसेवक आयुक्त कार्यालयात दाखल; विजय वडेट्टीवार गटाची प्रतीक्षा, कडेकोट सुरक्षा व्यवस्थेमुळे परिसर छावणीत रूपांतरित
Nagpur Divisional Hearing
Nagpur Divisional Hearing Pudhari
Published on
Updated on

Nagpur Divisional Hearing

नागपूर : चंद्रपूर महानगरपालिकेतील काँग्रेस गटनेतेपदाच्या वादावर आज नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयात महत्त्वपूर्ण सुनावणी होत असून, या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. सुनावणीपूर्वीच काँग्रेसच्या २७ नगरसेवकांपैकी माजी खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या गटाचे १६ नगरसेवक विभागीय आयुक्त कार्यालयात दाखल झाले आहेत. तर विजय वडेट्टीवार समर्थक गटाचे नगरसेवक अद्याप कार्यालयात पोहोचले नसल्याने त्यांच्या उपस्थितीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

गटनेतेपदाच्या निवडीवरून काँग्रेसमध्ये निर्माण झालेल्या वादाचा निर्णय आजच्या सुनावणीत महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. दोन्ही गटांना आपल्या बाजूने बहुमत असल्याचा दावा करत गटनेतेपदावर हक्क सांगितला आहे. त्यामुळे प्रत्यक्ष सुनावणीदरम्यान कोणत्या गटाकडे किती नगरसेवक उपस्थित राहतात आणि बहुमत कोण सिद्ध करते, यावर पुढील राजकीय समीकरणे अवलंबून असणार आहेत.

Nagpur Divisional Hearing
Chandrapur Congress | काँग्रेसमध्ये सत्ता संघर्ष शिगेला; १६ नगरसेवकांसह धानोरकरांचा गटनेतेपदावर मजबूत दावा

सुनावणीच्या पार्श्वभूमीवर नागपूर विभागीय आयुक्त कार्यालय परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मोठ्या संख्येने पोलीस कर्मचारी तैनात असल्याने संपूर्ण परिसराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेण्यात आली आहे.

प्रतिभा धानोरकर गटाचे १६ नगरसेवक वेळेत दाखल झाल्याने त्यांच्या गटाने आपले संख्याबळ दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. दुसरीकडे विजय वडेट्टीवार गटाचे नगरसेवक अद्याप न पोहोचल्याने त्यांच्या उपस्थितीबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. सुनावणीदरम्यान दोन्ही गटांकडून बहुमत सिद्ध करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे आणि नगरसेवकांची उपस्थिती महत्त्वाची ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news