मोझॅक अळीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कॅबिनेटमध्ये मदतीचा निर्णय घेणार: धनंजय मुंडे

मोझॅक अळीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कॅबिनेटमध्ये मदतीचा निर्णय घेणार: धनंजय मुंडे

नागपूर, पुढारी वृत्तसेवा: शेतकरी सध्या संकटात आहे, अशावेळी उद्याच्या कॅबिनेट बैठकीत शेतकऱ्यांचे मोझॅक अळीमुळे जे नुकसान झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त मदत देण्यावर शासन निर्णय घेणार आहे. एसडीआरएफ, एनडीआरएफ व पीक विमा या तिहेरी मानकावर मदत केली जाणार असल्याची माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे  (Dhananjay Munde) यांनी आज (दि.२) माध्यमांशी बोलताना दिली.

नागपूर जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या पाहणी दौऱ्यावर आलेले मुंडे (Dhananjay Munde) बोलत होते. 2021-22 च्या नुकसान भरपाईची शासकीय मदत प्रलंबित आहे, ते शेतकऱ्यांना लवकरच हस्तांतरित केले जाईल.

पीक विमा संदर्भात बोलताना 1 रुपया पीक विम्यातून जेथे शेतकऱ्यांचे अतिवृष्टी व दुष्काळामुळे नुकसान झाले, त्यांना पीक विम्यातून अंतरिम 25 टक्के मदत ही पीक विमा कंपनीकडून दिली जाणार आहे. पुढच्या पाच ते सहा महिन्यानंतर संपूर्ण राज्यात ई पंचनामे प्रक्रिया राबवली जाईल. अतिवृष्टी असो की नैसर्गिक आपत्ती सर्वांसाठी राज्यात ई पंचनामे उपयुक्त ठरतील, असा विश्वास बोलून दाखविला.
दरम्यान, खा. संजय राऊत यांच्या टीकाकडे लक्ष वेधले असता कुठल्याही मुद्द्यावर गंभीर नसलेले राऊत माध्यमांसाठी करमणुकीचे साधन आहे. सकाळी 9 वाजता संजय राऊतांचे तेच तेच आरोप करणे व आम्ही त्याचे उत्तर द्यावे, याचा आता आम्हालाच कंटाळा आला आहे. कापसाच्या व सोयाबीन उत्पादन खर्चाच्या 50 टक्के भाव शेतकऱ्यांना देण्याचा सरकारचा प्रयत्न राहील, असे धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले.

या पाहणी दौऱ्यात खासदार कृपाल तूमाने, जिल्हा भाजप अध्यक्ष सुधाकर कोहळे, जिल्हा राष्ट्रवादी अध्यक्ष बाबा गुजर, आमदार टेकचंद सावरकर, माजी आमदार सुधीर पारवे आदी स्थानिक पदाधिकारी, नागरिक सहभागी झाले होते.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news