Nagpur: ब्रिटिश एअरवेजच्या विमानाचे नागपुरात 'इमर्जन्सी लँडिंग'; १६९ प्रवाशांचा जीव भांड्यात, नेमकं काय घडलं?

British Airways emergency landing: लंडनहून हैदराबादच्या दिशेने झेपावलेल्या ब्रिटिश एअरवेजच्या विमानात अचानक तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने आज पहाटे नागपुरातील विमानतळावर विमानाचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले.
British Airways emergency landing
British Airways emergency landingfile photo
Published on
Updated on

British Airways emergency landing

नागपूर: लंडनहून हैदराबादच्या दिशेने झेपावलेल्या ब्रिटिश एअरवेजच्या विमानात अचानक तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने आज पहाटे नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानाचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. सुदैवाने, वैमानिकाच्या प्रसंगावधामुळे विमानातील १६९ प्रवासी सुखरूप असून मोठा अनर्थ टळला आहे.

British Airways emergency landing
Ranchi Air Ambulance Crash: आणखी एक विमान अपघात, झारखंडमध्ये एअर ॲम्ब्युलन्स कोसळली; ७ जणांचा मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, ब्रिटिश एअरवेजचे बोईंग ७८७ हे विमान लंडनवरून हैदराबादला जात होते. विमान हवेत असतानाच त्यात तांत्रिक बिघाड झाल्याचे वैमानिकाच्या निदर्शनास आले. याच दरम्यान हैदराबादमधील हवामानही खराब असल्याने तिथे लँडिंगची परवानगी नाकारण्यात आली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून वैमानिकाने तत्काळ नागपूर विमानतळावर आपत्कालीन लँडिंगची परवानगी मागितली.

नागपूर विमानतळावर परवानगी मिळताच सर्व यंत्रणा हायअलर्टवर ठेवण्यात आल्या होत्या. पहाटे ५:३० वाजताच्या सुमारास विमानाचे नागपूर विमानतळावर सुरक्षित लँडिंग झाले. विमान धावपट्टीवर सुखरूप उतरताच प्रशासनाने आणि प्रवाशांनी सुटकेचा निश्वास टाकला.

British Airways emergency landing
Ajit Pawar Plane Accident CBI Probe |अजित पवारांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशी : मुख्यमंत्री फडणवीस

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news