BJYM Protest Nagpur |नागपुरात 'भाजयुमो' हर्षवर्धन सपकाळ यांच्याविरोधात रस्त्यावर

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या बेजबाबदार वक्तव्याचा भाजपतर्फे आज राज्यभर तीव्र निषेध करण्यात आला.
BJYM Protest Nagpur
नागपुरातील महाल गांधीगेट परिसरात भारतीय जनता युवा मोर्चातर्फे हर्षवर्धन सपकाळ यांच्याविरोधात आंदोलन करण्यात आले.Pudhari
Published on
Updated on

Harshvardhan Sapkal controversy

नागपूर: ​छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांची तुलना करून तमाम शिवभक्तांच्या भावना दुखावणाऱ्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या बेजबाबदार वक्तव्याचा भाजपतर्फे आज राज्यभर तीव्र निषेध करण्यात आला.

नागपुरातील महाल गांधीगेट परिसरात भारतीय जनता युवा मोर्चातर्फे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर युवा मोर्चा अध्यक्ष सचिन करारे यांच्या नेतृत्वात निषेध आंदोलन करण्यात आले. सपकाळ यांच्या प्रतिकात्मक पोस्टरला जोडे मारून आंदोलन करण्यात आले.

BJYM Protest Nagpur
Nagpur News | खासदार भजन स्पर्धेत ७५४ भजनी मंडळींनी केला विठ्ठलनामाचा जागर

यावेळी महामंत्री रितेश पांडे,रिषभ अरखेल,कुलदीप माटे,संपर्क महामंत्री नागेश साठवने, मध्य विधानसभा समन्वयक अथर्व त्रिवेदी,मंडल अध्यक्ष सन्नी झेंडे,केतन साठवने, सुमित शाहू,रितेश पांडे,हर्षल वाडेकर, धवल आत्राम, प्रज्वल मंगर,अनुप समुंदरे,साहिल ठाकुर, लखन धुसिया,अदिति लांजेवार व मोठ्या संख्येने युवा मोर्चाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news