Fake Caste Certificate | गोविंदराव वंजारी इंजिनिअरिंग कॉलेजमधील बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणाची चौकशी करा : भाजप

संस्थेचे सचिव आमदार अभिजित वंजारी हे या संस्थेच्या प्रशासकीय पदावर असल्यामुळे या प्रकरणावर दबाव टाकण्याची शक्यता
Govindrao Wanjari Engineering College
अनुसूचित जमाती मोर्चाचे अध्यक्ष आकाश मडावी यांच्या वतीने निवेदन सह-आयुक्त, अनुसूचित जमाती जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी समिती यांना देण्यात आले.​Pudhari
Published on
Updated on

Govindrao Wanjari Engineering College

नागपूर : नागपूर येथील गोविंदराव वंजारी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी येथे काही गैर-आदिवासी विद्यार्थ्यांनी बनावट अनुसूचित जमाती (ST) जात प्रमाणपत्रांच्या आधारे प्रवेश घेतल्याची गंभीर बाब समोर आली आहे.

या प्रकरणाची व्याप्ती पाहता, सखोल, निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्यात यावे, या मागणीचे निवेदन भाजपा नागपूर अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांच्या मार्गदर्शनात अनुसूचित जमाती मोर्चाचे अध्यक्ष आकाश मडावी यांच्या वतीने सह-आयुक्त, अनुसूचित जमाती जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी समिती यांना देण्यात आले.​

Govindrao Wanjari Engineering College
Nagpur Congress | नागपुरात काँग्रेस भाकरी फिरविणार: विकास ठाकरेंच्या जागी नवा अध्यक्ष कोण?

संस्थेचे सचिव आमदार अभिजित वंजारी हे या संस्थेच्या प्रशासकीय पदावर असल्यामुळे या प्रकरणावर दबाव टाकण्याची शक्यता आहे, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.​

केवळ याच महाविद्यालयात नव्हे, तर राज्यातील इतर खासगी शैक्षणिक संस्थांमध्येही अशाच प्रकारे बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे प्रवेश घेतले जात असल्याची शक्यता असल्याने सर्व संस्थांची सखोल चौकशी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

Govindrao Wanjari Engineering College
Nagpur news | जिल्ह्यात डिजिटल क्रांती: 71 टक्के वीजबिलांचा भरणा ऑनलाईन

या प्रकरणात आतापर्यंत ११ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून काही आरोपींना अटकही झाली आहे. मात्र, हा घोटाळा अधिक मोठा असण्याची शक्यता नाकारता येत नाही. धक्कादायक बाब म्हणजे, या प्रकरणात महाविद्यालयातील काही प्राध्यापक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याचे आढळून आले आहे. परंतु, अद्याप त्यांच्यावर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.

या निवेदनाद्वारे दोषींवर कठोर कारवाई करून भविष्यात अशा घटनांना आळा घालण्याची विनंती करण्यात आली आहे. यावेळी भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा नागपूर शहर अध्यक्ष आकाश मडावी, महामंत्री रोहित कुमरे, महामंत्री अनिकेत कुंबरे, उपाध्यक्ष सागर इवनाते आणि लतीकेश परतेकी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news