Chandrashekhar Bawankule | काँग्रेसने लाडक्या बहिणींचा विश्वासघात केला, जनता बदला घेईल:  चंद्रशेखर बावनकुळे      

अनुसूचित जाती, ओबीसी आणि इतर घटकांतील महिलांना पुढे येण्यापासून रोखण्याचे काम काँग्रेसने केल्याचा आरोप
Chandrashekhar Bawankule
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेPudhari Photo
Published on
Updated on

Chandrashekhar Bawankule on Congress

नागपूर :   महिला आरक्षणाच्या विधेयकावरून आज सोमवारी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. “लाडक्या बहिणींचा विश्वासघात काँग्रेसने केला असून या वृत्तीचा जनता बदला घेईल,” असेही ते म्हणाले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांना संसदेत मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध करून दिली असताना अनुसूचित जाती, ओबीसी आणि इतर घटकांतील महिलांना पुढे येण्यापासून रोखण्याचे काम काँग्रेसने केल्याचा आरोप त्यांनी केला.

Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar Bawankule | संभाव्य दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर लवकरच सविस्तर बैठक; बावनकुळे यांची माहिती

यवतमाळ जिल्ह्यातील आदिवासी मुली बेपत्ता प्रकरणाबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, या संदर्भातील माहिती गृह खात्याकडे असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घातले आहे. विदर्भातील हा गंभीर प्रश्न असल्याने आपणही लक्ष ठेवणार असून आदिवासी मंत्री अशोक ऊईके यांच्याकडूनही या प्रकरणावर देखरेख ठेवली जात आहे.

दरम्यान, नागपूरमधील रियाज काजी यांच्यामार्फत मुलींचे धर्मांतरण प्रकरणाबाबत  पोलिसांनी कठोर कारवाई केली असून मोठा परिणाम होऊ शकणारी ही बाब वेळेत रोखण्यात यश आले आहे.

Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar Bawankule | अमरावती प्रकरण गंभीर, दोषींना कठोर शिक्षा होईल : चंद्रशेखर बावनकुळे

दरम्यान, परतवाडा प्रकरणाबाबत “पूर्ण अधिकृत माहिती बाहेर येईपर्यंत कोणत्याही प्रकारचे आरोप-प्रत्यारोप टाळावेत. अशा संवेदनशील प्रकरणांमुळे दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण होऊन अमरावतीचे वातावरण बिघडू नये, याची सर्वांनी काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. पोलिसांकडून या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी मातंग समाजाच्या प्रतिनिधींशी चर्चा करून योग्य निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news