

नागपूर : लकडगंज पोलिस ठाण्याच्या हद्दीत कोटा कॉलनी रोडवर ऑटो चालक निलेश नगराळे याच्यावर त्याचाच मित्रांनी चाकूने केला हल्ला केल्याची घटना आज शनिवारी दुपारी घडल्याने खळबळ माजली. ऑटो चालक गंभीर जखमी झाला असून जखमी अवस्थेत पीडित ऑटोसह लकडगंज पोलिस ठाण्यात दाखल झाला.
पोलिसांनी आपल्या रुग्णवाहिकेच्या प्रतीक्षेत वेळ न दवडता तातडीने त्याच ऑटोमध्ये त्याला घेऊन जात रुग्णालयात दाखल केले. मात्र ऑटोचालकावर मित्रांनी हा जीवघेणा हल्ला का चढविला यामागील कारणांचा शोध लागलेला नाही. प्राथमिक माहितीनुसार दारू का पाजली नाही म्हणून आणि आर्थिक कारणातून हा हल्ला झाल्याचे बोलले जाते. विशेष म्हणजे यावेळी भाजपचे आंदोलन सुरू होते आणि वर्दळीच्या भागातील पोलिस स्टेशनमध्ये वाहन उपलब्ध नसल्याने आश्चर्य व्यक्त केले गेले. शेवटी एका पोलिसाला त्याच व्यक्तीच्या ऑटोमध्ये सोबत देत जखमीला मेयो रुग्णालयाकडे रवाना करण्यात आले.