

नागपूर : जिल्ह्याच्या अनेक पोलीस स्टेशनच्या हद्दीत 74 चोरी प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात हुडकेश्वर पोलिसांना यश आलं. नागपुर जिल्ह्यात कामठी येथील प्रसिद्ध ड्रॅगन पॅलेस येथे देखील त्याने चोरी केल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी त्यांचाकडून साडे सहा लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे.
दीपक बनसोड असे सराईत चोरट्याचे नाव आहे. दीपक बनसोड मूळ मध्य प्रदेशातील बालाघाट येथील रहिवासी असून, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात चोरीचे आधीच तब्बल 68 गुन्हे दाखल होते. यापैकी तीन प्रकरणात त्याला न्यायालयाने शिक्षा ठोठावली होती.
आता त्याने नागपूरच्या हुडकेश्वर पोलिसांना पाच वाहन चोरी आणि एक घरफोडीच्या घटना केल्याची कबुली दिली असून, एकूण 74 गुन्हे आता त्याच्या नावावर दाखल झाले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.