Ashish Jaiswal : महायुतीत स्पर्धा नाही, शिंदे- फडणवीसांमधील नाराजी टीव्हीपुरतीच; राज्यमंत्री आशिष जयस्वालांची स्पष्टोक्ती

बच्चू कडूंनी केली दुष्काळी मदत वाढविण्याची मागणी
Minister Ashish Jaiswal on Shinde-Fadnavis rift.
राज्यमंत्री आशिष जयस्वाल, प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक बच्चू कडू. Pudhari news
Published on: 
Updated on: 

Minister Ashish Jaiswal on Shinde-Fadnavis rift

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोन प्रमुख नेत्यांमधील नाराजी केवळ दूरचित्रवाणीवरच दिसते, असे विधान राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी केले. या दोन मोठ्या नेत्यांच्या विषयावर आपल्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांनी बोलण्याचा अधिकार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. दुसरीकडे, प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक बच्चू कडू यांनी अमरावतीतील व्हायरल व्हिडिओ प्रकरणावर माध्यमांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत शेतकऱ्यांना मिळणारी पाच हजार रुपयांची दुष्काळी मदत अपुरी असल्याचे सांगितले. दिवाळीपर्यंत ही मदत दहा ते पंधरा हजार रुपयांपर्यंत वाढविण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

महायुतीमध्ये स्पर्धा नाही

राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी महाविकास आघाडी आणि महायुतीमधील राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना महाविकास आघाडीत स्पर्धा सुरू असल्याचे म्हटले. मात्र, महायुतीमध्ये अशी स्पर्धा नसल्याचा दावा त्यांनी केला. पुणे विधान परिषद निवडणुकीतील उमेदवारी मागे घेण्याच्या विषयावर विदर्भातील नेते भाष्य करणार नाहीत, अशी भूमिका असल्याचेही त्यांनी सांगितले.

Minister Ashish Jaiswal on Shinde-Fadnavis rift.
Ashish Jaiswal : शिवसेना कार्यकर्त्यांनी पक्ष संघटन बळकट करावे

ती चर्चा दुर्गामातेच्या प्रसादासंदर्भात: बच्चू कडू

बच्चू कडू यांनी अमरावतीतील व्हायरल व्हिडिओ प्रकरणाबाबत स्पष्टीकरण देताना, हा विषय अंतर्गत बैठकीत दुर्गामातेच्या प्रसादासंदर्भात झालेल्या चर्चेशी संबंधित होता, असे सांगितले. माध्यमांनी मात्र वेगळाच अर्थ लावून प्रसादाचा विषय दाखविला, असे मत त्यांनी व्यक्त केले.

दुष्काळी मदत वाढविण्याची अपेक्षा

राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना दिली जाणारी पाच हजार रुपयांची मदत अपुरी असल्याचे बच्चू कडू यांनी नमूद केले. ही मदत पहिला टप्पा असून, दिवाळीपर्यंत शेतकऱ्यांना दहा ते पंधरा हजार रुपयांपर्यंत अधिक मदत मिळावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. अहिल्यादेवी होळकर योजनेबाबत बोलताना गरीब शेतकऱ्यांना अधिक मदत मिळावी आणि पात्र लाभार्थी योजनेपासून वंचित राहू नयेत, याकडे लक्ष देण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांना योजनेतून वगळण्यात आले असल्याचे सांगत, तरीही एखाद्या पात्र शेतकऱ्याचे नाव वगळले गेले असल्यास त्याची दखल घेऊन कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Minister Ashish Jaiswal on Shinde-Fadnavis rift.
Ashish Jaiswal| राज्यमंत्र्यांच्या मागणीने खळबळ : वनविभागाच्या विश्रामगृहात मांसाहाराची परवानगी द्या!

विदर्भात शिवसेना विस्तारावर भर

शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीबाबत बच्चू कडू यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाचा उल्लेख केला. प्रतिकूल परिस्थितीतही शिवसेनेने काम केले असून, आता पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भात पक्षाचा विस्तार करण्यावर विशेष भर दिला जात आहे. गावागावांत शिवसेना पोहोचवून महाराष्ट्रातील इतर भागांप्रमाणे विदर्भातही पक्षाची ताकद वाढविण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. एकनाथ शिंदे यांचे विदर्भाकडे सातत्याने लक्ष असून, विदर्भाला विधान परिषदेचे चार आमदार मिळाले आहेत. त्यामुळे विदर्भातील जनतेनेही एकनाथ शिंदे यांना प्रतिसाद द्यावा, असे आवाहन बच्चू कडू यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news