Ajit Pawar Death Controversy | रोहित पवार पुराव्यानिशी पोलिसांत का जात नाहीत, मुनगंटीवार यांचा सवाल, सबुरीने घेण्याचा दिला सल्ला!

रोहित पवार अभ्यासू पण त्‍यांनी जनतेत संभ्रम तयार करु नये
Ajit Pawar Death Controversy
Ajit Pawar Death Controversy | रोहित पवार पुराव्यानिशी पोलिसांत का जात नाहीत, मुनगंटीवार यांचा सवाल, सबुरीने घेण्याचा दिला सल्ला
Published on
Updated on

नागपूर - उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाताची चौकशी सुरू असताना आपल्या पोलिस,गुप्तचर यंत्रणेवर त्यांचा विश्वास नाही का, काही पुरावे असतील तर त्यांनी थेट बारामती पोलिस स्टेशनला जाऊन ते द्यावेत अशी सूचना भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज केली.

व्हिएसआर विमान कंपनीशी संबंध असल्याच्या कारणावरून केंद्रीय नागरी उड्डयन मंत्र्यांचा राजीनामा मागण्यात काही अर्थ नाही. शरद पवार यांचेही अनेकांशी जवळचे संबंध आहेत म्हणून काय उद्या वेगळा संशय व्यक्त केला जाऊ शकतो का, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. सातत्याने ते पत्रपरिषद घेत असून मी त्या बघितल्या मात्र यामुळे जनतेत उगीच संशय निर्माण होतो.

आमदार रोहित पवार अभ्यासू असून माझे चांगले मित्र आहेत मात्र त्यांनी आपल्या अभ्यासाचा उपयोग असा जनतेत उगीच संशय निर्माण करण्यासाठी करू नये असा सबुरीचा सल्ला देखील त्यांनी आज माध्यमांशी बोलताना दिला. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय परिषदेत कपडे काढून काँग्रेस कार्यकर्त्यांचे आंदोलनाची त्यांनी टिंगल केली. जनतेने निवडणुकीत त्यांचे कपडे काढल्याने ही वेळ आली असे सांगत महात्मा गांधी यांच्या हत्येचा संघाचा, गोडसे यांचा संघाचा संबंध नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले असताना आता काँग्रेसनेते राहुल गांधी काय बोलतात,याला काहीच अर्थ नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news