Govinda Visit Nagpur | अभिनेता गोविंदाने जामसांवली धामात घेतले श्री हनुमानाचे दर्शन

विधिवत पूजा-अर्चना करून घेतला आशीर्वाद; गोविंदाला पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी
Jamsavli Dham Hanuman Temple visit Actor Govinda
अभिनेता गोविंदा यांनी जामसांवली धाम येथे भेट देत श्री हनुमानाचे दर्शन घेतलेPudhari
Published on
Updated on

Jamsavli Dham Hanuman Temple visit Actor Govinda

नागपूर : सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेता गोविंदा यांनी प्रसिद्ध धार्मिक व श्रद्धास्थान असलेल्या चमत्कारिक श्री हनुमान लोक, जामसांवली धाम येथे भेट देत श्री हनुमानाचे दर्शन घेतले. त्यांनी विधिवत पूजा-अर्चना करून श्री हनुमानाचा आशीर्वाद घेतला. गोविंदा यांच्या आगमनाची माहिती मिळताच दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती.

जामसांवली धामात आगमन झाल्यानंतर मंदिर संस्थानच्या वतीने गोविंदा यांचे आत्मीय स्वागत व सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना श्री हनुमानाची प्रतिमा भेट देऊन सन्मानित करण्यात आले. गोविंदा यांच्या उपस्थितीमुळे मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

Jamsavli Dham Hanuman Temple visit Actor Govinda
Nagpur Police Raid | रुद्र डेअरी फार्मवर पोलिसांचा छापा; ११० गोवंशीय पशूंची सुटका; तिघांवर गुन्हा

गोविंदा यांच्या आगमनाची वार्ता परिसरात पसरताच मोठ्या संख्येने भाविक जामसांवली धामात दाखल झाले. आपल्या आवडत्या अभिनेत्याची एक झलक पाहण्यासाठी भाविकांमध्ये उत्सुकता दिसून आली. मंदिर परिसरात गोविंदा यांना पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.

पूजा-अर्चनेनंतर गोविंदा यांनी जामसांवली धामाचे धार्मिक व आध्यात्मिक महत्त्व जाणून घेतले. श्री हनुमानाप्रती श्रद्धा व्यक्त करत त्यांनी धामातील आध्यात्मिक ऊर्जा आणि भक्तिमय वातावरणाचे कौतुक केले. त्यांच्या या भेटीमुळे जामसांवली धाम पुन्हा एकदा चर्चेचे केंद्र ठरले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news