नागपूर : पांढुरणा मध्यप्रदेशच्या सीमावर्ती भागामध्ये राष्ट्रीय महामार्ग 47 वर भागेमहिरी शिवारात सोमवारी (दि.30) भीषण अपघात झाला. हा अपघात अज्ञात वाहनाने दुचाकीला मागील बाजूस जोरदार धडक दिल्याने झाला. यावेळी दुचाकीवर स्वार असलेल्या तिघांचा मृत्यू झाला. घटनास्थळी दोघांचा मृत्यू झाला. यावेळी गंभीर जखमी झालेल्या तरुणाला रुग्णालयात घेऊन जाताना मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.
नागपूर जिल्ह्यातील केळवद पोलीस स्टेशनच्या हद्दीत अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीचा हा अपघात झाला. काटोलकडे जात असताना अज्ञात वाहनाने धडक दिली. या भीषण अपघातात 10 वर्षाच्या मुलासह तिघांचा मृत्यू झाला. राष्ट्रीय महामार्ग 47 वरील ही घटना असूनअज्ञात वाहनाचा केळवद पोलिसांकडून शोध सुरू आहे.