मला बदनाम करण्याचं षडयंत्र : रामदास तडस | पुढारी

मला बदनाम करण्याचं षडयंत्र : रामदास तडस

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : भाजप खासदार रामदास तडस यांनी आपल्यावरील सुनेने केलेले सर्व आरोप फेटाळले आहेत. रामदास तडस यांची सून पूजा तडस यांनी नागपुरातील एका पत्रपरिषदेत गंभीर आरोप केले. याविषयी प्रचार दौऱ्यावर असताना माध्यमांशी बोलताना खासदार रामदास तडस म्हणाले, 2020 पासून त्यांचं प्रेम संबंध आहेत, त्यांचे लग्न झालं, ते मला माहिती नव्हते. सध्या त्यांचं प्रकरण     कोर्टात प्रकरण सुरू आहे. माझी सून तिच्यासोबतचे लोक वारंवार पैशाची मागणी करत होती. माझा मुलगा 4 वर्षांपासून माझ्या सोबत राहत नाही. मी वर्धेत तर तो देवळीला राहतो. या लग्नानंतर मी मुलाला बेदखल केलं आहे. चार वर्षापूर्वीचे हे प्रकरण आहे. विरोधकांना माझ्याविरोधात दुसरे मुद्देच नसल्याने निवडणुकीत ते आता बाहेर काढलं, त्यामुळे मला बदनाम करण्याच हे षडयंत्र आहे मात्र वर्धेतील जनतेला सत्यता माहिती असल्याने मला चिंता नाही असा दावा रामदास तडस यांनी केला.

Back to top button