नागपुरात कोरोनामुळे महिलेचा मृत्यू; आरोग्य विभागाची डोकेदुखी वाढली

कोरोना विषाणू
कोरोना विषाणू

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : होळी आणि लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर नागपुरात गुरुवारी (दि.२१) एका ७८ वर्षीय महिलेचा कोरोनाने मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे नागपूरमधील आरोग्य विभागाची डोकेदुखी वाढली आहे. देशात कुठेही कोरोना रुग्ण, लाट नसताना नागपुरात सातत्याने रुग्ण कसे? असा प्रश्न नागरिकांमधून व्यक्त होत आहे. शहरातील गरोबा मैदान परिसरातील ही महिला मेडिकल रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल झाली होती. त्यामुळे  सोबतच्या इतर रुग्णांनाही संक्रमणाचा धोका व्यक्त केला जात आहे.

ही महिला दोन दिवसांपूर्वी मेडिकल रुग्णालयात दाखल झाली होती. ह्रदयविकाराचा आजार असल्याने सुरुवातीला तिला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी तिला न्युमोनिया असल्याचे सांगण्यात आले.  त्यानंतर तिला मेडिकल रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. यावेळी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. मेडिकल प्रशासनाने ही महिला करोनाने दगावल्याची माहिती मनपा आरोग्य विभागाला दिली. त्यानंतर करोना नियमानुसार महापालिकेच्या वाहनातून नेत कुटुंबियांनी निवडक लोकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार केले. या महिलेला करोना असल्याच्या वृत्ताला महापालिकेतील आरोग्य विभागानेही दुजोरा दिला आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news