नागपूर : दादोजी कोंडदेव पुरस्कार विजेते क्रीडा प्रशिक्षक संजय काणे यांचे निधन | पुढारी

नागपूर : दादोजी कोंडदेव पुरस्कार विजेते क्रीडा प्रशिक्षक संजय काणे यांचे निधन

नागपूर : पुढारी वृत्‍तसेवा दादोजी कोंडदेव पुरस्कार विजेते आणि शहरातील दिग्गज ॲथलेटिक्स प्रशिक्षक संजय (भाऊ) काणे यांचे हृदयविकाराने निधन झाले. सोमवारी दुपारनंतर त्यांच्या पार्थिवावर गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांच्या पश्चात दोन भाऊ, एक बहीण व अनेक नातेवाईक असा परिवार आहे.

कोठी रोड महाल येथील रहिवासी असलेल्या 75 वर्षीय भाऊंनी शहरातून तब्बल 11 आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवले आणि आपले जीवन खेळासाठी समर्पित केले. 1973 मध्ये एमकॉमचे सुवर्णपदक विजेते भाऊ यांनी 2009 मध्ये एसबीआयकडून व्हीआरएस घेतले आणि खेळाडू तयार करणे आणि सुधारणेवर लक्ष केंद्रित केले. नव महाराष्ट्र क्रीडा मंडळ (NMKM) चे संस्थापक भाऊ यांनी गेल्या वर्षी २६ नोव्हेंबर रोजी त्यांच्या क्लबचा सुवर्णमहोत्सव साजरा केला आणि त्यांच्या सर्व माजी क्लब सदस्यांसोबत क्लबला पुढे कसे न्यायचे याबाबत विविध उपक्रमांवर चर्चा केली. भाऊ काणे यांच्या निधनाची वार्ता दुःखद असल्याची शोकसंवेदना केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आदी मान्यवरांनी व्यक्त केली आहे.

नवमहाराष्ट्र क्रीडा मंडळाच्या माध्यमातून भाऊंनी नागपूर शहरात अनेक खेळाडू घडवले. आज त्यांनी घडवलेले खेळाडू राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले कर्तृत्व गाजवत आहेत. त्यांच्या निधनाने नागपूरच्या क्रीडा क्षेत्राची अपरिमित हानी झाली. भाऊंसारख्या आधुनिक द्रोणाचार्यास भावपूर्ण श्रद्धांजली अशी शोकसंवेदना व्यक्त केली.

हेही वाचा : 

Back to top button