Ashish Deshmukh: मनोज जरांगे यांची राजकीय महत्वाकांक्षा जागृत : डॉ.आशिष देशमुख | पुढारी

Ashish Deshmukh: मनोज जरांगे यांची राजकीय महत्वाकांक्षा जागृत : डॉ.आशिष देशमुख

नागपूर, पुढारी वृत्तसेवा :  मराठा आरक्षण मार्गी लागल्यानंतर सर्व मराठा समाजाचे हित होत असताना मनोज जरांगे यांची राजकीय महत्त्वकांक्षा जागृत झाली असल्याचा आरोप माजी आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी केला आहे. मराठा समाजाला हाताशी धरुन आपली राजकीय पोळी भाजणे जरांगे शिकून घेत आहेत. फडणवीस यांच्याबाबत अपशब्द वापरले, ते मराठा समाज आणि राज्यातील जनतेला आवडलेले नाही. काहीतरी नौटंकी करुन सागर बंगल्यावर जाण्याची त्यांची घिसाडघाई सुरू आहे. Ashish Deshmukh

सर्वांना माहित आहे की, जरांगेना ॲापरेट करणारा नेता कोण आहे? जरांगेचा मास्टर माईंड कोण आहे? हे माहित आहे. त्यामुळे जरांगे फडणवीसांबद्दल असे बोलत आहेत. राजकीय महत्वकांक्षा जरांगे पाटील यांना असली तरी त्यांचा गुजरातचा हार्दिक पटेल होणार आहे. मुळात फडणवीस यांनीच मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. ५० वर्षांपासून मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी होती, ती मागणी फडणवीस यांनी पूर्ण केली आहे. Ashish Deshmukh

दुसरीकडे राज्यातील वरिष्ठ नेत्यांचा पक्ष संपला आहे. जे सातत्याने जरांगे  यांना ॲापरेट करत आहेत. जरांगे राजकीय व्यक्ती आहेत. यापूर्वीही ते विविध राजकीय पक्षाच्या स्टेजवर बसले होते. मराठा समाजाच्या आंदोलनाचा फायदा घेत, स्वत:चा राजकारण जरांगे करत आहेत. मात्र, बालबुद्धी असलेल्या जरांगे  यांच्यासोबत मराठा समाज आता जाणार नाही. कधीकाळी विशिष्ट समाजाबद्दल राज्याचे वरिष्ठ नेते जे बोलायचे तेच आता जरांगे बोलत आहेत, असेही देशमुख म्हणाले.

हेही वाचा 

Back to top button