जरांगे पाटील यांना अटक झाल्यास जेलभरो आंदोलन करणार : उमरगा सकल मराठा समाजाचा सरकारला इशारा | पुढारी

जरांगे पाटील यांना अटक झाल्यास जेलभरो आंदोलन करणार : उमरगा सकल मराठा समाजाचा सरकारला इशारा

धराशिव; पुढारी वृत्तसेवा : सगेसोयरे अध्यादेश लागू करण्यास दिरंगाई करत मराठा समाजावरील गुन्हे मागे न घेतल्यामुळे मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केले आहे. सरकारकडून त्यांचे बदनामीचे षडयंत्र रचले जात आहे. यामुळे मनोज जरांगे पाटील उपमुख्यमंत्र्यांच्या सागर बंगल्यावर निघाले आहेत याला उमरगा तालुका सकल मराठा समाजाने रविवारी (दि २५) रात्री बैठक घेऊन पाठिंबा दिला. तालुक्यातील मराठा समाज बांधव मुंबईला जाणार असुन जरांगे पाटील यांना अटक झाल्यास जेलभरो आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सरकारने सगे-सोयरे बाबत अधिसुचना काढुनही अंमलबजावणी केली नाही. तसेच मराठा समाजावरील गुन्हे मागे न घेतल्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी १० फेब्रुवारी पासुन आमरण उपोषण सुरु केलेले आहे. निष्कलंक, चारित्र्यवान अनेक वर्षापासुन मराठा समाजाला एक निखळ, प्रामाणिक नेतृत्व मिळालेले आहे. समाजासाठी ते गेले सहा महिन्यापासुन उपोषणावर उपोषण, आंदोलन करुन अधिसुचना मिळवली परंतु सरकारने त्याची अंमलबजावणी केलेली नाही. तसेच मराठा आंदोलकावरील गन्हे मागे न घेता दिलेला शब्द पाळला नाही. उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री फडणवीस यांच्या सांगण्यावरुन जरांगे पाटलांवर नाहक आरोप केले आहेत. मराठा संघर्ष योध्याची बदनामी करुन ओबीसीमधून (५० टक्केच्या आतुन) हक्काचे आरक्षण देण्याऐवजी घटनाबाह्य न टिकणारे १० टक्के आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणुक केली आहे. महाराष्ट्रातील सकल मराठा समाज भाजप प्रणित सरकारवर तिव्र नाराजी व्यक्त करुन करो या मरो या भुमिकेतुन रविवारी मुंबईच्या दिशेने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर आंदोलणा करीता निघाले आहेत. यावर चर्चा करण्यासाठी सायंकाळी झालेल्या बैठकीत उमरगा तालुका सकल मराठा समाजाने जाहिर पाठिंबा दिला आहे. तसेच शेकडो युवक मुंबईला जाणाऱ असुन त्यांना अटक झाल्यास उमरगा शहरात जेलभरो आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीसाठी समाजबाधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Back to top button