नागपूर जिल्ह्यात २ लाख नवमतदार वाढले | पुढारी

नागपूर जिल्ह्यात २ लाख नवमतदार वाढले

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : नागपूर लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी करीत असल्याने हा हेवीवेट लढतीचा मतदारसंघ आहे. नागपूर व रामटेक लोकसभा अशा दोन मतदारसंघात 2024 लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने जिल्हा प्रशासन कामाला लागले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आज (दि.२३) नागपूरची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

नागपूर जिल्ह्यात 2 लाख 10 हजार नवीन मतदार समाविष्ट करण्यात आले आहेत. ज्यामध्ये 17 ते 19 वयोगटातील एकूण 88 हजार नवीन मतदारांची नावनोंदणी करण्यात आली आहे. सोबतच मृत मतदार किंवा स्थलांतर झालेल्या मतदारांचे नाव कमी करण्यात आले आहे. ज्यामधून जवळपास 1 लाख 8 हजार 317 मतदारांची नावे कमी करण्यात आली आहे. इथून पुढे नवीन नोंदणी किंवा काही दुरुस्ती असेल, तर ती प्रक्रिया सुरू राहणार असल्याची महिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटनकर यांनी दिली आहे.

हेही वाचा 

Back to top button