नागपूर : राम जन्मभूमी आंदोलनातील सहभागाबद्दल फडणवीस यांना चांदीची गदा! | पुढारी

नागपूर : राम जन्मभूमी आंदोलनातील सहभागाबद्दल फडणवीस यांना चांदीची गदा!

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : श्री राम जन्मभूमी आंदोलनामध्ये सहभागी झाल्याबद्दल राम रक्षा हिंदू समितीतर्फे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शनिवारी रात्री कारसेवक म्हणून चांदीची गदा देऊन सत्कार करण्यात आला
‘राम लला हम आयेंगे, भव्य मंदिर बनायेंगे… ही घोषणा अखेर खरी ठरली आहे. ५०० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर रामलल्ला विराजमान होणार आहेत. हा सर्वोच्च आनंदाचा क्षण असल्याचे यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले
हिंदू रक्षा समितीच्यावतीने महाल येथील पंडित बच्छराज व्यास चौकात शनिवारी श्रीराम उत्सव साजरा करण्यात आला. रामजन्मभूमी आंदोलनात सहभागी झालेल्या देवेंद्र फडणवीस यांचा गदा देऊन सत्कार करण्यात आला. संत साहित्याचे अभ्यासक श्रीराम जोशी यांचाही सत्कार करण्यात आला. संजय शिरपूरकर, सुनील काबरा,सुबोध आचार्य यावेळी उपस्थित होते.
कारसेवकांच्या आठवणींना यावेळी फडणवीस यांनी उजाळा दिला. ६ डिसेंबर १९९२ रोजी सकाळी सर्व कारसेवक एकत्र जमले. कलंकाचा ढाचा खाली येणार असा निर्धार करूनच सर्व एकत्र जमले होते यावर भर दिला.

Back to top button