

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : दारूड्या पतीने दारू पिण्यास पैसे मागितल्याने पती – पत्नीत वाद झाला. वाद विकोपाला गेल्याने रागाच्या भरात पत्नीने पतीच्या डोक्यात दगड मारून त्याचा खून केला. कामठी तालुक्यातील आवंढी गावात शनिवारी रात्री ही घटना घडली. आनंद भदुजी पाटील (वय ५०) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी पत्नी आरुणा पाटील (वय ४५) हिच्यावर कामठी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आनंद पाटील हा मोलमजुरीचे काम करत होता. त्याला दारूचे व्यसन असल्याने नेहमी पती- पत्नीत वाद होत होता. शनिवारी (दि.३०) रात्री आनंद पाटील याने पत्नी आरुणा हिच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. त्यामुळे दोघांमध्ये वाद झाला. वाद विकोपाला गेल्याने रागाच्या भरात आरुणा हिने आनंद पाटील याच्या डोक्यात दगड मारून त्याचा खून केला. त्यानंतर
नवीन कामठी पोलीस ठाण्यात येऊन तिने पतीच्या खूनाची कबुली दिली.
हेही वाचा ः