भाजप, शिंदे गट मंत्री,आमदार रेशीमबाग स्मृती मंदिरात, अजितदादा गटाची दांडी

रेशीमबाग येथील स्मृती मंदिराला भेट
रेशीमबाग येथील स्मृती मंदिराला भेट

नागपूर ; पुढारी वृत्‍तसेवा महायुतीतील भाजप व शिंदे गट शिवसेनेचे मंत्री, आमदार तसेच विधानसभा आणि विधान परिषदेतील आमदारांनी आज (मंगळवार) सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबाग येथील स्मृती मंदिराला भेट दिली. त्यांनी डॉ. हेडगेवार यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. तसेच गोळवलकर गुरुजी यांच्या स्मृतीला देखील पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने उपराजधानी नागपुरात येणाऱ्या भाजप आमदारांसह सहयोगी पक्षाच्या आमदारांसाठी दरवर्षी मार्गदर्शन वर्ग भरवला जातो. विदर्भ प्रांत सहसंघचालक श्रीधर गाडगे यांनी आमदारांना पंचसूत्री मार्गदर्शन केलं. मंगळवारी भाजप आमदारांचा स्मृती मंदिरात अभ्यासवर्ग आयोजित करण्यात आला होता. भाजपच्या समर्थनाने सत्तेत असलेले शिंदे गटाच्या आमदारांची उपस्थिती असली तरी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व त्यांच्या गटाचे आमदार गैरहजर होते. यामुळे राजकीय वर्तुळात बरीच चर्चा रंगली.

आ. प्रवीण दरेकर यांनी आले असते तर चांगलेच झाले असते, शिकायला मिळाले असते, हे प्रेरणास्थळ असल्याचे सांगितले. दरम्यान, आ अमोल मिटकरी यांनी फुले, शाहू, आंबेडकर विचारसरणी आम्ही सोडलेली नाही, सरकारमध्ये असलो तरी कुठे जायचे हा प्रत्येक पक्षाचा निर्णय असतो असे स्पष्ट केले. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री रामगिरीवर बैठकीत व्यस्त असल्याची माहिती मिळाली. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आमदार मनीषा कायंदे, श्रीधर गाडगे, विदर्भ प्रांत सह संघचालक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रामुख्याने उपस्थित होते.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news