नागपूर: फटाक्यांच्या आतषबाजीमुळे ४ मुलांसह ११ जण जखमी

History Of Firecrackers
History Of Firecrackers

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : उपराजधानीत फटाक्यांच्या आतषबाजीमुळे चार मुलांसह ११ जण जखमी झाले. नागपुरातील मेडिकल शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल रुग्णात ११ वर्षांखालील चार रुग्णांचा समावेश आहे. नागपुरात दिवाळी जल्लोषात साजरी झाली असली तरी अनेक ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत.

हायकोर्टाने रात्री 8 ते 10 दरम्यान फटाके फोडण्याचे निर्बंध घातल्यावरही रात्री उशिरापर्यंत फटाके, धूम धडाम आवाज, प्रदूषण सुरूच होते. दिवाळीनिमित्त शहरातील सगळ्याच भागात घरोघरी रोषणाई करण्यासह फटाक्यांची आतषबाजीही केली जाते. लक्ष्मी पूजनाच्या निमित्ताने रविवारी शहरात सर्वत्र फटाक्यांची आतषबाजी केली गेली. विश्वचषक क्रिकेट सामन्याचीही या आतषबाजीत भर पडली.

फटाक्यांमुळे डोळे, शरीरातील इतर भाग,  कानाला फटाक्यांच्या इजा झाली. मेडिकल रुग्णालयात आलेल्या काहींना फटाक्यांमुळे भाजून किरकोळ इजाही झाल्या आहेत. उपचार करून त्यापैकी बहुतांश रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आल्याची माहिती मेडिकल प्रशासनाने दिली. यासोबतच अनेक खासगी रुग्णालयातही रुग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत.
दरम्यान, उपराजधानीत रविवारी सायंकाळी फटाक्यांच्या आतषबाजीत १७ ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडल्याची माहिती मनपा अग्निशमन विभागाचे प्रभारी मुख्य अग्निशमन अधिकारी बी. चांदनखेडे यांनी दिली. सुदैवाने कुठली प्राणहानी यात झाली नाही. सर्वाधिक ४ घटना लकडगंज हद्दीत तर त्या खालोखाल प्रत्येकी ३ घटना त्रिमूर्तींनगर, सक्करदरा, गंजीपेठ, नरेंद्रनगर हद्दीत घडल्या आहेत.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news